सुक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answers
Answer:
1) सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:- "अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे
सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय."
वैशिष्ट्येः- सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
1) वैयक्तिक घटकांचा अभ्यासः- सूक्ष्म अर्थशास्त्रात
विशिष्ठ उद्योग संस्था, कुटूंब संस्था, वैयक्तिक किंमती
यांसारख्या लहान वैयक्तिकी आर्थिक घटकांच्या
आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदा:- वैयक्तिक
मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा
2) विभाजन पद्धती:- सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान
घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक
घटकाचा स्वतंत्रपणे, तपशिलवा अभ्यास केला जातो.
उदा. राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाच
3) अंशिक समतोल:- सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण
म्हणजे अंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक
समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर
आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या
समतोलाचा अभ्यास केला जातो. उदा. एक उपभोक्ता,
विशिष्ट उद्योग इ. अभ्यास.
4) किंमत सिद्धांत:- सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या
किंमत निश्चितीशी संबंधीत तसेच उत्पादन घटकांच्या
किंमत निश्चितीशी संबंधीत आहे. या शास्त्रात किंमतींचा
अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असेही
म्हणतात.
5) बाजार रचनांचे विश्लेषण:- सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण
स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार,
बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते.
6) मर्यादित व्याप्ती :- सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी
मंदी, व्यवहारतोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी,
लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी
आर्थिक समस्यांशी संबंधीत नसून फक्त वैयक्तिक
घटकांपुरती मर्यादित आहे.
7) अनेक गृहितांवर आधारितः- सूक्ष्म अर्थशास्त्रात
इतर परिस्थिती कायम' या मूलभूत गृहितकाचा आधार
घेउन विवेचनाची सुरुवात केली जाते. पुर्ण रोजगार,
शुद्ध भांडवलशाही, पुर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे
धोरण इ.सिद्धांताचे विवेचन सोपे होते.
8) सीमांत तत्वाचा वापरः- सीमान्त संकल्पना सूक्ष्म
आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमान्त
परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण
परिमाणात होणारा बदल होय. याचा वापर सूक्ष्म
बदलांचा परिणाम, उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक
निर्णय घेताना केला जातो.