स्काऊट गाईड गाठीचे प्रकार
Answers
Answer:
गाठी : एका दोराचे (किंवा दोरीचे, नाडीचे वा इतर तत्सम वस्तूचे) टोक त्याच्या दुसऱ्या टोकाला किंवा दुसऱ्या दोराच्या टोकाला, किंवा कडीला, खुंटाला अथवा खांबाला किंवा अन्य वस्तूला घट्ट बांधून ठेवण्याची पद्धती. दोराच्या गाठी बांधण्याच्या अनेक पद्धती आहेत. विजारीच्या नाडीची टोके विशिष्ट पद्धतीने आवळून बांधली, तर नाडी आपोआप सुटत नाही परंतु नाडीचे विशिष्ट टोक ओढले, तर नाडीची गाठ चटकन सुटते. विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोर-बादलीचा उपयोग करताना रहाटाच्या दोरीचे टोक बादलीच्या कडीमध्ये एका ठराविक पद्धतीने गुंतविले, तर पाण्याच्या वजनाने दोरीची गाठ सुटत नाही. परंतु गाठीतील दोरी एका विशिष्ट रीतीने मागे सरकवली, तर गाठ लवकर सुटते. गोठ्यातील गुरे खुंटांना बांधून ठेवण्यासाठी दोराच्या गाठी बांधाव्या लागतात. त्या गाठी योग्य पद्धतीने मारल्या तर गुरांनी दोर ओढला, तरी त्यांच्या मानेभोवती दोराचा फास बसत नाही.
आ १. रीफ गाठीचे प्रकार : (अ) चांगली पद्धत, (आ) मध्यम प्रतीची गाठ, (इ) सुरगाठ (सैल पद्धत), (ई) शस्त्रक्रिया गाठी. आ. २. जाड दोराचे टोक बांधून ठेवण्याच्या पद्धती. आ. ३ गुंडी गाठ. आ. ४. निरनिराळ्या व्यासांचे दोर बांधण्याची कोष्टी गाठ: बक-लहान व्यासाचा दोर. आ. ५. (अ) साधी गाठ, (आ) दुहेरी गाठ. आ. ६. सारख्या व्यासाच्या दोन दोरांची टोके एकमेकांत गुंतविण्याच्या पद्धती. आ. ७. राजगाठीचे प्रकार: (अ) साधी राजगाठ, (आ) दुहेरी राजगाठ, (इ) आवळ गाठ, (ई) दाब गाठ. आ. ८. मासे पकडण्याच्या दोरीची नळीची गाठ. आ. ९. आकडा-दोरी गाठ. आ. १०. फासाकार गाठ: (अ) अर्धा फास, (आ) खुंटीवरचा अर्धा फास, (इ) सरक फास. आ. ११. शिडाचे व तंबूचे दोर बांधण्याच्या गाठी: (अ) लंवगी फास, (आ) एक वळसा आणि दोन अर्धे फास, (इ) शिडाचा फास. आ. १२. यारीने उचलण्याच्या लाकडावरचे फास: (अ) साधा वासा फास, (आ) दुहेरी वासा फास, (इ) लाटण फास.