Social Sciences, asked by nitinkawane, 1 month ago

४) सामाजिक क्रिया किंवा कृती ही पूर्णत: आहे.
1} लोकशाही प्रक्रिया
2} हुकूमशाही प्रक्रिया
3} भांडवलशाही प्रक्रिया
4} राजेशाही प्रक्रिया​

Answers

Answered by JSP2008
1

समाजवाद : संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली. उत्पादन, विभाजन आणि विनिमय यांची साधने जनतेच्या म्हणजे समाजाच्या मालकीची व्हावीत, प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांची जोपासना करण्याची समान संधी दिली जावी व त्यातून समाजाच्या उत्पादनशक्तीचा विकास व्हावा, ही तत्त्वे तीत अध्याह्त आहेत. दारिद्रय आणि शोषण संपुष्टात आणून न्याय्य पातळीवर समाजाची पुनर्रचना करणे व मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचे आवाहन समाजवादाच्या संकल्पनेत अभिप्रेत आहे.

थोडक्यात समाजवादी विचारसरणीने समता व न्यायावर आधारित नव्या समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला. या विचारप्रणालीच्या पुरस्कर्त्यांच्या मते व्यक्तिहितापेक्षा समाजहित महत्त्वाचे आहे. औदयोगिक कांती, त्या क्रांतीनंतर निर्माण झालेली आर्थिक विषमता आणि व्यक्तिवाद व भांडवलशाही या सर्वांच्या प्रतिकियेतून समाजवादी विचार निर्माण झाला. भांडवलशाही समाजरचना जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा तिच्या अर्थव्यवस्थेतील दोषांमुळे त्याची प्रतिकिया म्हणून एकोणिसाव्या शतकात समाजवादाचा विचार पुढे आला आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत अधिकारांवर आधारलेली लोकशाही कांती घडून आली. समाज-वाद हा सोशलिझम या इंगजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असून सोशॅलिझम या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘ सहकार ’ असा आहे. समाजवादाची व्याख्या अनेकांनी केली आहे.

Similar questions