सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ' म्हणजे काय ? *
Answers
१. ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो, तो दूर करून व्यक्ती म्हणून सर्वांचा समान आहे याचा आग्रह धरणे म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय.
२. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींच्या आधारे श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेद न करणे, विकासाची समान संधी उप्लब्ध करून देणे हे न्याय व समतेमागील उद्दिष्ट आहे.
३. संविधानाने सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे.
४. यासाठी सर्व समाजघटकांना सामावून घेण्याबाबत काही प्रयत्न केले जातात. उदा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, वंचित घटकांकरता शिक्षण व रोजगारामध्ये राखीव जागांची तरतूद, अल्पसंख्याकांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांबाबत तरतूद, तसेच स्त्रियांसाठीचे विविध कायदे इत्यादी.