Sociology, asked by sumitjadhavlm10, 1 month ago

सामाजिक संबंधाच्या एकूण व्यवस्थेला कोणती
संज्ञा लावण्यात येते?
समुदाय
समाज
मंडळ
सामाजिक संस्था​

Answers

Answered by rehan012774
0

Answer:

सोशल रिलेशन्स ). दोन अथवा अधिक व्यक्तींत प्रस्थापित होणारे संबंध. हे संबंध अनेक प्रकारचे, भिन्न स्वरूपाचे आणि परिस्थित्यनुसार प्रसंगोपात्त बदलणारे, कधी सौहार्दपूर्ण तर कधी संघर्षमय असतात. व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते. सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या अडी-अडचणी सोडवीत असतात आणि गरजा पूर्ण करतात; कारण कोणतीही व्यक्ती ही मूलतः स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी जीवन व्यतीत करू शकत नाही. सामाजिक संबंध व्यक्तिव्यक्तींमधील परस्परसंबंधांची नानाविध रूपे दर्शवितात. समाजातील माणसांमध्ये वर्षानुवर्षे कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदी व्यवहार चालू असतात. समाजात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांवर कुटुंबाच्या संस्कारांबरोबरच हळूहळू शेजारपाजाऱ्यांचे संस्कारही होत असतात. कालांतराने या मुलाचे/मुलीचे समाजातील अनेक व्यक्तींशी संबंध येतात. त्याचे आपाततः परिवर्तन ‘माणूस’ या क्रियाशील सामाजिक प्राण्यामध्ये होते. माणूस एक सामाजिक प्राणी आहे, या उक्तीनुसार तो समाजाबाहेर राहू शकत नाही. माणूस आणि इतर माणसे यांच्यातील परस्परसंबंध म्हणजेच सामाजिक संबंध होय.

समाजात राहिल्याशिवाय माणूस माणूस होणार नाही आणि अनेक माणसे एकत्रितपणे आल्याशिवाय समाज अस्तित्वात येणार नाही. समाज ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी संकल्पना असून व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह यांत परस्परसंबंधांचे एक अतूट नाते निर्माण होते. अर्थात ही संकल्पना व्यापक असून तिच्या चिकित्सक अभ्यासाला समाजशास्त्रज्ञ मॅकायव्हर‘समाजशास्त्र’ म्हणतात. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध/संपर्क आला की, त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. हे सामाजिक संबंध दृढतर होण्यासाठी संवाद व परस्परांतील देवाण-घेवाण ही प्रधान माध्यमे असून हळूहळू ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रित होते आणि कालांतराने मित्रवर्ग हा समूह तयार होतो.

Answered by lakshmikuttyamma4934
0

Answer:

same yesssssssssssssss

Similar questions