• सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय?
Answers
Explanation:
प्रकारसामाजिक स्तरीकरण सार्वत्रिक असले, तरी त्याचे स्वरूप मात्र प्रत्येक समाजात सारखे असत नाही. जन्माला आलेल्या व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची संधी आहे की नाही, यानुसार सामाजिक स्तरीकरणाचे ‘बंदिस्त स्तरीकरण’ आणि ‘मुक्त स्तरीकरण ‘ असे दोन मूलभूत प्रकार पाडले जातात.
जेव्हा जन्मच्या आधारे व्यक्तीला विशिष्ट स्तराचा सदस्य मानले जाते, तेव्हा तिला त्या स्तरात कायम राहावे लागते. अशा स्तरीकरणास ‘बंदिस्त स्तरीकरण’ म्हटले जाते. या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची संधी नसते. भारतातील ‘जातिव्यवस्था’ हे याचे ठळक उदाहरण होय. पुढे जातिव्यवस्थेतील श्रमविभागणी व व्यवसायविभागणी यातूनच बलुतेदारी-अलुतेदारी पद्घती अस्तित्वात आली.
जेव्हा व्यक्तीची गुणवत्ता, पात्रता, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, व्यवसाय यांचा विचार करून तिला विशिष्ट स्तराचा सदस्य मानले जाते, तेव्हा अशा स्तरीकरण व्यवस्थेस ‘मुक्त स्तरीकरण’ असे म्हणतात. हे स्तरीकरण कायमचे किंवा बंद असत नाही. या व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची अनुमती, संधी व सोय असते. ‘वर्गव्यवस्था’ हे याचे ठळक उदाहरण होय.