सामाजिक विषमता निर्माण होणाऱ्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात
Answers
आर्थिक विषमता : खाजगी मालमत्तेच्या मूलभूत हक्कावर आधारलेल्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि कुटुंबा-कुटुंबांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली दिसून येते. हीच आर्थिक विषमता होय.
आर्थिक विषमतेची कारणे
राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषम विभागणीला थोड्याबहुत प्रमाणात भांडवलशाही किंमत-यंत्रणा, तर बऱ्याच अंशी भांडवलशाहीच्या आधारभूत संस्था कारणीभूत झालेल्या आहेत. समाजातील मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे तसेच निरनिराळ्या व्यवसायांमध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये कामगारांना व मजुरांना प्राप्त
होणाऱ्या कमीअधिक उत्पन्नामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. मालमत्तेच्या खाजगी हक्कामुळे मूठभर धनिक वर्गातील व्यक्तींना भांडवलावरील व्याज, जमिनीचा खंड, भाडेपट्टी, स्वामित्व शुल्क व भांडवलाच्या विनियोगापासून मिळणारा नफा अशा वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळते. तसेच मालमत्तेवरील वंशपरंपरागत वारसाहक्कामुळेही आर्थिक विषमतेत मोठी भर पडते.
भांडवलशाही देशांत प्रामुख्याने दोन वर्ग दिसून येतात: एक वर्ग जमीनजुमला, मालमत्ता स्वाधीन असलेल्या धनिकांचा व दुसरा वर्ग केवळ मानवी श्रमशक्तीशिवाय दुसरे काहीच हाती नसलेल्या निर्धनांचा म्हणजे श्रमिकांचा. धनिकवर्गाला वर सांगितलेल्या अनेक मार्गांनी उत्पन्न लाभते. याउलट श्रमिकवर्गाला केवळ मजुरी, मासिक वेतन, मेहनताना या स्वरूपात उत्पन्न मिळते. औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या भांडवलशाही देशांत राष्ट्रीय उत्पन्नाचा ३० ते ३५ टक्के भाग एकूण लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या भांडवलदार वर्गाकडे, तर उरलेले ६५ ते ७० टक्के उत्पन्न उर्वरित ९० टक्के जनतेला प्राप्त होते.
निरनिराळ्या उद्योगधंद्यांत मजुरीचे दर वेगवेगळे असतात. वैद्यक, अभियांत्रिकी, वकिली वगैरे उच्च व्यवसायांत प्रवेश मिळविण्यासाठी शिक्षणावर बराच खर्च करावा लागतो. त्यामुळे अशा लायक व्यक्तींचा पुरवठा, त्या त्या व्यवसायातील मागणीच्या मानाने बराच मर्यादित राहतो. म्हणून ह्या व्यवसायांत वैयक्तिक उत्पन्नाचे प्रमाण अधिक असते. गरीब जनतेला उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण यांवर अधिक खर्च करणे परवडत नाही. वेतनातील व अर्जनातील विषमता यांमुळे निर्माण होते. समाजातील आर्थिक विषमता बहुतांशी मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे व मालकी हक्काच्या परंपरागत प्राप्तीमुळे निर्माण झाली आहे. निरनिराळ्या उद्योगधंद्यांतील कमीअधिक वेतनांमुळे किंवा मजुरीच्या दरांमुळे निर्माण होणारी आर्थिक विषमता त्या मानाने मर्यादित स्वरूपाची असते.
Answer:
सोर्रर्रर्रर्रर्रर्रर्रयययचेयऊऊउpleeerrrrrrrwgwhww