Economy, asked by aathirag6492, 1 year ago

सीमेवरील जवानाचे मनोगत निबंध

Answers

Answered by Hansika4871
113

मित्रहो आज देश स्वतंत्र होऊन ७२ वर्षे झाली. इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो तरी भारता बाहेरील परकीय शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी मला आपल्या भारतीय सैन्याला दिवसाचे २४तास, रात्रं दिवस कडा पहारा द्यायला लागतो.

शत्रूच्या आक्रमणाची दहशत असल्याने ऊन, थंडी, वारा, पाऊस ह्यांचा विचार न करता, आमच्या कुटुंबीयांपासून लांब राहून देशाचं संरक्षण करणं हे आम्ही आमचं प्रथम ध्येय समजतो. देशासाठी प्रत्येक नागरिकाने आपल स्वापणाला लाऊन सैनिकांप्रती आणि देशाप्रती आदर ठेवावा आणि किंमत जानावी.

Answered by ItsShree44
56

Answer:

दहा महिने झाले, घर सोडल्याला. तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो. पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली आणि मंजूर रजा रद्द झाली. तातडीचा हुकूम निघाला होता. डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करत, या सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो. वाटेत जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले. तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला.

तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे. हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे. येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते. तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे. डोळ्याला दुर्बीण लावून आम्हाला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो. शत्रूच्या गोटात थोडीशीही हालचाल दिसली, तरीही आम्हांला त्याची नोंद घ्यावी लागते. डोळ्यांत तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर? माझ्या गावात मी सुखी नव्हतो का?

आजही मला गावातले ते दिवस आठवतात. खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही. पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना! घराबाहेर पडणे आवश्यक झाले. लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते. गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो. वर्ष-दीड वर्ष खूप खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो.

येथे सीमेवर मरणाची थंडी असते. अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो. पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो. महिन्यातून एखाद दुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते. परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगूळ पाठवला. राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या. दिवाळीचा फराळही आला. थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता, भगिनींनी स्वेटर मफलर विणून पाठवले. तेव्हाच समाधान वाटले की, आपण एकटे नाही. आपल्यामागे आपला देश आहे. आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत; पण त्याची चिंता वाटत नाही. माझा देश माझ्या घरादाराची, माझ्या मुलामाणसांची काळजी घेईलच ! आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईनच!

Similar questions