साम्य वादाच्या मते समाज परी वर्तन आवशक आहे
Answers
Answer:
समाजशास्त्र : मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. ‘ समाजशास्त्र ’ ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली; तथापि तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो. समाजशास्त्रीय विचारांची मुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जाऊन पोहोचतात. सेंट सायमन (१७६०-१८२७) याने प्रथमत: समाजाचा अभ्यास शास्त्राच्या पातळीवर नेण्याची आवश्यकता प्रतिपादिली. प्रबोधनकाळ आणि तद्नुषंगाने नव्याने पुढे आलेले विचार, तत्कालीन सामाजिक प्रकिया, चळवळी या सर्वांनी समाजशास्त्राच्या प्रगतीला मोठी प्रेरणा दिली. त्याकाळच्या परिस्थितीवरील प्रतिकिया म्हणून अनुभववाद पुढे आला. ऑग्यूस्त काँत याने समाजशास्त्राचे नामकरण केले आणि समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धत वापरण्यावर भर दिला. तत्कालीन समाजरचना हा सामाजिक उत्कांतीच्या विकासाचा उच्च्बिंदू असल्याने कांतिकारक बदल अनावश्यक आहेत, असे त्याचे मत होते. त्याने समाजशास्त्राचा अभ्यास हा प्रत्यक्ष सत्तावादाच्या भूमिकेतून करावयास पाहिजे असे प्रतिपादिले. त्याच्या मते समाजशास्त्रसुद्धा इतर शास्त्रांसारखे निश्र्चित स्वरूपाचे करता येईल.
शास्त्रज्ञांच्या मते ज्या पद्धतींनी शास्त्रीय अभ्यास करता येतो, त्याच पद्धतीचे अवलंबन या शास्त्राच्या अभ्यासात सुद्धा करता येईल व केले पाहिजे. या त्याच्या भूमिकेतूनच जीवन नियतिवाद, यांत्रिक नियतिवाद आदी विचार मांडले गेले. समाजाला शरीराची उपमा दिली गेली व ज्या पद्धतीने शरीराचे आकलन करता येते, त्याच पद्धतीने समाजाचेही आकलन करता येईल, असा सिद्धांत पुढे आला. साहजिकच समाजरचनेसंबंधी जो जीवात्मक सिद्धांत मांडला गेला, त्याचे मूळ या संकल्पनेत आहे. पुढे स्पेन्सरने (१८२०-१९०३) त्याच्या उत्कांतिवादी सिद्धांतामध्ये जैविक सेंद्रियवादाच्या मांडणीत आणि व्यापक सामाजिक जीवनाचे जीवशास्त्रीय संकल्पनांच्या साहाय्याने विश्लेषण करून काँतच्या कल्पनेस आणखी मूर्त स्वरूप दिले; परंतु समाजशास्त्रामध्ये भरीव योगदान एमील द्यूरकेम (१८५८-१९१७) ह्या फेंच शास्त्रज्ञाने केले. समाजशास्त्राला एक अनुभवनिष्ठ शास्त्र म्हणून प्रस्थापित करण्याचे श्रेय द्यूरकेमला देता येते. सामाजिक रचना व सामाजिक शक्ती ह्या व्यक्तीपेक्षा बाह्य आहेत, असे त्याने मत मांडले. प्रत्येक समाज सर्वसाधारणपणे प्रचलित झालेल्या सामूहिक संकल्पनांवर ( उदा., कायदा, धर्म, नीती इत्यादी ) आधारलेला असतो. या सामुदायिक संकल्पना मानवी जाणिवेवर सामाजिक पर्यावरणामुळे लादल्या जातात. प्रत्येक समाज सामाजिक एकतेने बांधलेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत एकता यांत्रिक असते, तर प्रगत अवस्थेत ती सेंद्रिय असते. आधुनिक समाजात दुर्बल होणाऱ्या सामाजिक जाणिवा द्यूरकेमच्या मते नीतीची बांधणी करून सुधारता येतात.
.
Explanation: