सैनिकांची महत्त्व speech in Marathi
Answers
Answer:
Explanation:
प्रस्तावना:
सैन्य हि आपल्या देशातील पुरातन काळातून आलेली अशी देशाच्या संरक्षणाचा एक गट आहे. सैन्य हे आपल्या देशाचे परदेशी शत्रू देशापासून आपले संरक्षण करते.
सैन्यचे प्रकार
पुरातन काळात पण सैन्य होते. मुघल सरकार, हिंदू सरकार तेव्हा पायदळ, घौड दल असे सैन्याचे प्रकार होते. पण आता फक्त आर्मी पायदळ हि संरचना आपणास माहित आहे. प्रत्येक देशात सैन्य असते. त्यासाठी शारीरिक परीक्षा घेऊन निवड केली जाते.
भारतीय लष्कराची सुरवात
आपल्या देशात भारतीय लष्कराची सुरुवात १५ ऑगस्ट १९४७ साली सुरु झाली. आज आपण फक्त सैन्य बद्दल बोलणार आहोत, फक्त आपल्या देशाची नाही तर इतर सर्व देशातील सैन्य बद्दल माहिती घेणार आहोत.
सैनिकाचे जीवन
सैनिकाचे जीवन आपण समजतो तितके सोपे नाही. तो आपला भारताचा सैनिक असो किंवा इतर कोणत्याही देशाचा प्रत्येक सैनिक आपल्या देशाच्या संरक्षणा साठी तत्पर असतो.
तो हि आपल्या सारखाच एक साधारण व्यक्ती आहे. काहीच अशी मुले किंवा मुली असतात ज्यांना सैन्य दलात जाण्याची आवड असते.
सैन्य भरती
या साठी एक प्रक्रिया असते, ज्यात शारीरिक चाचणी आणि काही परीक्षा द्याव्या लागतात त्यातून निवड करून सैन्या मध्ये दाखल केले जाते. जास्त भर शरीरास चाचणी वर जो खरा उतरेल त्याचीच निवड केली जाते. कारण आपल्या बुद्धीला जो ताब्यात ठेऊ शकतो आणि हव्या त्या परिस्थितीला समोर जाऊ शकतो.
सैनिकाचे काम
आपण नोकरी करतो , ८ तास १२ तास , आणि घरी थकून येऊन आपली कामे करून झोपून जातो. हा आपला दिनक्रम सण, नातेवाईक, सांगे सोयरे यांच्या सानिध्यात राहतो.
पण आपला सैनिक याला ८ तास आणि १२ तास हे काहीच माहित नाही. त्याला आपल्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवायचे असते. म्हणून डोळ्यात तेल घालून रात्र-दिवस देशाच्या सीमेवर हातात बंदूक, तोफ गोळे घेऊन सीमेवर तैनात असतो.
आपल्या घरापासून लांब, परिवारापासून लांब कोणाला बोलू शकत नाही भेटू शकत नाही. हे जीवन फक्त तोच जगू शकतो.
जीवन मरण
जगायची इच्छा आहे पण देशासाठी आणि मरणाची तर भीतीच नाही असा हा सैनिक जर आपल्या देशाच्या सीमेवर नासता तर आज परकीय देश आपल्या देशात घुसून आपल्या देशावर आक्रमण करून आपल्याला गुलाम बनविले असते.
याचा परिवार पण आपल्या देश साठी एक मिसाल आहे. कारण एक आई आपल्या पोटच्या मुलाला सैन्यात पाठवते तर विचार करा त्या आईचे काळीज किती मोठे असेल.
जय जवान जय किसान
लाल बहादूर शास्त्री यांनी हि उपमा आपल्या देशातील सैन्य आणि शेतकरी याना दिली आहे कारण सैनिक देशाची रक्षा आणि आपली रक्षा करतो, आणि शेतकरी या जमिनीत धान्य पिकवून आपले पोट भरतो. या दोघं मध्ये काहीच फरक नाही.
आपल्या देशात घुसखोरी, आतंकवाद, २६/११ सारखे हमले रोखणारे आपले सैनिकच आहेत. असे किती शाहिद झाले असतील आपले सैनिक आपल्या भारताचा सैनिक तसाच दुसऱ्या देशाचा पण सैनिक हा आपल्या देशासाठी बलिदान देतो. तो हि माणूसच आहे. हे आपण विसरू नये.
देशासाठी शाहिद
ती आई खूप महान आहे जो पोटचा गोळा देशासाठी अर्पण करते, त्या आई ला सुद्धा सलाम आहे, कारण एक आईच फक्त हे करू शकते. जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी शाहिद होते, तेव्हा तिची अवस्था काय असते हे आपण स्वप्नात पण नाही करू शकत.
शहिदांना श्रद्धांजली
आपल्या देशाचा सैनिक हा त्या धर्तीचा पुत्र असतो अश्या शाहिदनं परमवीर चक्र , सारखे सन्मान देऊन गौरव देतात. त्यांना आपल्या देशाच्या झेंड्या मध्ये लपेटून त्यांच्या परिवाराला सोपवून देतात आणि सर्व सैनिक मिळून त्याना सलामी देऊन बिगुल वाजवून दुःख व्यक्त करतात. आणि शेवट त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.