India Languages, asked by Ompalange1020, 1 year ago

सैनिकाचे मनोगत मराठी निबंध​

Answers

Answered by tejasjalit057
2

Answer:

मी सैनिक बोलतोय...

मी पवन मोरे गेली पाच वर्षे काश्मीरच्या सीमेवर संरक्षण करणारा सैनिक लष्करात सामील झालो आहे. मी आणि माझे सैनिक बांधव देशाच्या सर्व सीमांवर तैन आहोत.

मित्रांनो, तुम्ही सारे आनंदात आहात ना? खरं तर तुम्हांला चिंता करण्याचं काह कारणच नाही. कारण कारगिलसारखा अतिथंड प्रदेश असो अथवा उन्हाचे चटके दे वाळवंट असो; तुमचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सगळीकडे आहोतच. जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव जहाजांवरून शत्रूची टेहळणी करीत असतात.

हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंघावत असते. आम्ही सारे प्राणांचं पर्वा न करता या संकटांचा सामना करतो. सीमेवर वावरताना माझ्या सहकाऱ्यांसोब निर्भयपणे परंतु जबाबदारीने वावरत असतो. आपल्या शासनामार्फत उत्तम प्रतीचे अन्न, पाणी, उबदार कपडे आम्हांला पुरवले जातात. निवासाची उत्तम सोय केली जाते. आवश्यक आधुनिक शस्त्रे पुरवली जातात. आधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही आम्हांला दिले जाते. मनावर ताण येऊ नये, नैराश्य येऊ नये यासाठी योगसाधना, खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात. यांमुळे देशसंरक्षणासाठी आम्ही सतत सज्ज असतो.

तुम्हांला वाटेल की आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो. पण असे नाही! कुठे पूर आला तर, आम्ही लोकांना पुरातून वाचवतो, कुठे आग लागली overline GK , प्राणांची पर्वा न करता तेथील लोकांची सुटका करतो. दुर्गम भागातील रस्ते बांधतो दंगल किंवा दोन गटांतील मारामाऱ्या झाल्या तर त्या मिटवण्याचा प्रयत्न करतो. संकटांत सापडलेल्यांना अन्नाची पाकिटे, औषधे पोहोचवतो.

हल्ली बऱ्याच वेळा अतिरेक्यांशी लढताना आमच्या तरुण सैनिकांना वीरमरण येते तेव्हा आम्हांला खूप दुःख होते. पण आम्ही दुःख मनात तसेच ठेवून देशसेवेला पुन्हा तत्पर होतो.

येथे सीमेवर प्रचंड कडाक्याची थंडी असते. अशा वेळी काही क्षण आम्हांला आमच्या कामाचा कंटाळा येतो. पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो. महिन्यातून एखाद-दुसरे घरचे पत्र येते. हल्ली आमच्याकडे मोबाइल असल्यामुळे फोनवर बोलताही येते. घरची खुशाली कळते. परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगूळ पाठवला. राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीचा फराळही आला. थंडी सुरु झाली की माता, भगिनी आमच्यासाठी स्वेटर, शाल, मफलर विणून पाठवतात. तेव्हा समाधान वाटते की, आपण एकटे नाही. आपल्याबरोबर आपला देश आहे. म्हणूनच आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत, त्याची खंत वाटत नाही.

pls mark me as brailialist

pls pls

Similar questions