स्पीच ऑन द ग्रेट छत्रपति शिवाजी महाराज 6 मिनट
Answers
Explanation:
शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे ||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||
समर्थांच्या या ओळी शिवरायांची महती स्पष्ट करतात. त्यांच्या कर्तृत्वाची आणि दातृत्वाची उंची दाखवून देतात. आज साडे तीन शतके व्यतित झाल्यानंतरही छत्रपतींचे स्मरण तिळमात्रही कमी होत नाहीये. त्यांच्या जीवनावर भाषण करणे म्हणजे माझेच नाही तर ते भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांचे देखील सौभाग्य आहे.
युगपुरुष, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, छत्रपती अशा एक ना अनेक उपाधी ज्या महापुरुषाला प्राप्त झाल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहेत. शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.