स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय सामंजस्य कसे विकसित होते ते लिहा. मराठी
Answers
Answer:
मूलत: सर्व मानवजात एकरूप आहे. भिन्न देशांत अन्न,वस्त्र, चालीरीती इ. बाबतींत भेद दिसत असले, तरी सर्वत्र मानवाच्या आशाआकांक्षा, गुणदोष, सुखदु:खे समान आहेत. सर्वत्र मानव पूर्णतेसाठी झटत आला आहे. व या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे आजची उन्नत मानवी संस्कृती होय. या संस्कृतीचे जतन करणे सर्व मानवांचे कर्तव्य आहे. युद्धांनी भांडणे मिटत नाहीत, हानी मात्र होते. क्षयादी रोग, धरणीकंपादी उत्पात, अज्ञान व अंधश्रद्धा हे सर्व मानवजातीचे शत्रू असून त्यांना तोंड देण्यासाठी सहकार्याची अभेद्य फळी निर्माण करणे श्रेयस्कर आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना सर्व धर्मांच्या तत्त्वप्रणालीत अंतर्भूत असली, तरी ही भावना रूजविण्याचे महत्त्व पहिल्या महायुद्धानंतर जाणवू लागले. त्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली व राष्ट्रांतील तंटे समजुतीने सोडविण्याचे तत्त्व मान्य करण्यात आले. यासाठी खाजगी प्रयत्नही झाले; १९२४ साली विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून रवींद्रनाथ टागोर यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या शिक्षणास जोराची चालना दिली. हे प्रयत्न निष्फळ झाले. दुसर्या महायुद्धाच्या शेवटी सामंजस्याची आवश्यकता अधिकच तीव्रपणे भासू लागली. या तीव्र जाणिवेतून संयुक्त राष्ट्रे ही संघटना निर्माण झाली. तिचे मुख्य उद्दिष्ट मानवी समतेवर आधारलेले स्नेहसंबंध सर्व राष्ट्रांत निर्माण करणे हे आहे.