Science, asked by ramji2015, 1 year ago

सौर कुकर सौर बंब सौरदिवा माहिती

Answers

Answered by Anonymous
8

Explanation:

इंधनाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. स्वयंपाकाचा गॅस, कोळसा, पेट्रोल, डिझेल इ. ज्वलनशील पदार्थाचे साठे संपल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. अशावेळी सौर ऊर्जेवर चालणा-या ‘सौरबंब’चा पर्याय उपयुक्त ठरेल. त्याने इंधनाची 60 ते 70 टक्क्यांनी बचत होईल.

आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. वीजटंचाईचं सावट दूर होईल असं 2003 सालापासून बोललं जात आहे. पण विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.

Similar questions