India Languages, asked by bhadaledhanasree, 7 hours ago

सारांश लेखन
माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे. अनेक परस्परविरोधी भावना आणि विचारप्रवाह तिथे वास करत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत. अशी इच्छा बाळगून वावरतो. ते शक्य असतं का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बर्बा बाजूही असतेच. त्याचप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचादेखील काही उपयोग होतच असतो. तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी, हे लक्षात ठेवायला हवं, म्हणून तर अशा परस्परविरोधी भावना व विचार (O मनात वावरतात. त्या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही. त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं. ज्याप्रमाणे चार चाकी गाडीत ब्रेक व अॅक्सिलेटर म्हणजे वेगनियंत्रक व प्रवर्तक असतात. त्याप्रमाणे मनाला चु वेगानं पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक मु विचार येतात. त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांनादेखील आळा बसतो. अर्थात नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेगदेखील घेणार नाही. म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे.​

Answers

Answered by s05882778
0

Answer:

okookoookoo okookoookoo

Answered by studay07
3

सारांश लेखन :

माणसांच मन एक अजब यंत्रणा आहे. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार असतात.पण आपले मन बहुतेक वेळा नकारात्मक विचारांकडे जास्त प्रभावित होते. त्या मुळे चांगले काम होत असलेले ही बिघडून जाते. पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर असते. . तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी, हे लक्षात ठेवायला हवं, म्हणून तर अशा परस्परविरोधी भावना व विचार असतात. नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेगदेखील घेणार नाही. म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे.

Similar questions