सारांश लेखन -
माणसाने हसावे किंवा हसू नये, असा प्रश्न कोणी कोणाला विचारणार नाही. माणसे प्रथम हसतात.
नंतरही हसतात. हसून मोकळी होतात. हसण्यामुळे मन मोकळे होते. वृत्ती उल्हसित होतात. हास्य ही एक
शारीरिक आणि मानसिक अशी संयुक्त क्रिया आहे. हसणान्याची मुद्रा, तिच्यावरचे स्नायू, ऊर आणि आतील
इंद्रिये असा कितीतरी भाग हसण्यात गुंतलेला असतो. हास्य ही अनेक प्रक्रियांची मालिका असते. अलीकडे
'हास्यसाधना' या नावाचा एक प्रयोग केला जातो. समाजातली जाणती माणसे ठरावीक वेळी ठरवून एकत्रित
येतात. पोट धरधरून, खळखळून मोठमोठ्याने हसतात. ज्याला ती का हसतात हे माहीत नसते, त्याला ती
वेडी वाटतात; पण हे पत्करलेले वेड असते.ते पांघरलेले नसते. या वेडात शहाणपण दडलेले असते. त्याला
मुक्तीचे पंख असतात. आजकालच्या अति औपचारिक आणि कृत्रिम जीवनपद्धतीत माणसे आंबून, अवघडून
जातात. त्यांच्या जीवनावर मळभ दाटते. ते दूर व्हावे म्हणून पोरवयात जसे आपण मोकळेपणाने हसतो, तसे
मोठेपणी हसून घ्यावे असे ज्यांना मनापासून वाटते, ते गंभीर प्रकृतीचे लोकही हल्ली हसण्यासाठी उत्सुक
असतात. वस्तुतः हसण्यासाठी पैसे पडत नाहीत, भांडवल लागत नाही; पण तरी माणसे दिलखुलासपणे हसत
नाहीत. सदैव हसतमुख असणे हे आनंददायक असते; पण ती झाली केवळ मुद्रा, हावभाव किंवा अभिव्यक्ती!
Answers
Answered by
4
लसतय रतमय च,ित यतस तिल तलि दलि जतसप डजतड
Answered by
0
Answer:
या उतार्याचे सारांश लेखन करा
Similar questions