Art, asked by ApurvaRajendraBagav, 11 months ago

२) सारांश लेखन.
पुढील उतारा वाचा आणि त्याचा एक – तृतियांश इतका सारांश लिहा.
चार माणसे शेजारीपाजारी, पारांवर, शाळेत, कचेरीत, बसमध्ये, आगगाडीच्या डब्यात या ना त्या निमित्ताने थोडा वेळ
जरी एकत्र जमली की, त्यांच्या बोलण्याचा, गप्पांचा आणि चर्चेचा विषय असता इतरांच्या चुका, इतरांचे दोष व इतरांची टवाळी!
म्हणजे ही एक प्रकारची परनिंदाच चाललेली असते, असे म्हण ना! मदयाची नशा चढावी त्याप्रमाणे परनिंदेची धुंदी माणसास
चढत असते. परनिंदा करणारा माणूस स्वत:च्या अंत:करणातील आणि सभोवतालच्या वातावरणातील प्रसन्नता नाहीशी करून
सर्वत्र दुःखाचे, औदासीन्याचे, निराशेचे, मत्सराचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यास हातभार लावत असतो. धूर ओकणा
या ज्योतीमुळे दिव्याची काच धुरकटून जाते आणि दिव्याचा पार हरपून जातो. मात्र ज्योतीची काजळी झटकली, ती मर्यादित
ठेवली व दिव्यावरील काच रोज सकाळी वा संध्याकाळी स्वच्छ पुसली की प्रकाश अवतीभवती लख्ख पसरतो. अंधकाराचा लोप
होऊन वातावरण उजळून निघते तसेच आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा पहाटे उठण्यापूर्वी मनाच्या काचेवर सतत इतरांच्या
अवगुणांच्या विचाराने जमलेली काजळी अंत:करणातील क्षमतेच्या राखेने स्वच्छ पुसली की, आपले मन दिवसभर टवटवीत राहते.
जेथे आपण जाऊ तेथे प्रसन्नताच निर्माण करण्यास आपला हातभार लागेल.​

Answers

Answered by siddhivd16
58

Answer:

गुणग्राहकता ही प्रसन्नतेची जननी

Explanation:

इतरांच्या चुका, दोष यांच्याबद्दल टवाळी करणे हे बर्‍याच लोकांचे आवडीचे काम असते. किंबहुना वेळ घालवण्याचे ते एक साधनच असते. त्यामुळे निंदा करणारे व ऐकणारे द्वेष, मत्सरी वातावरण निर्माण करीत असतात. परंतु निंदक माणसांनी इतरांचे गुणही समजून घेतले तर प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरवता येईल.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.

Answered by piyushkankhare13
8

Answer:

thanks it is help full thanks so much

Similar questions