Art, asked by bhagyashripatle2006, 2 months ago

२) सारांशलेखन :
पुढील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश
शब्दांत सारांश लिहा.
अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे. नाइलाज
झाल्याशिवाय हिंसा करूच नये. अशी भारतीय संस्कृतीची
शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय? प्राण घेणे,
जिवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरीक इजा करणे एवढीच
हिंसेची व्याप्ती नाही. दुसऱ्याचे मन दुखावणे, टोचून बोलणे
अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेचीच
रूपे आहेत. भारतात महात्मा गांधीनी अहिंसेचा मोठा प्रयोग
केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने आव्हान दिले. दक्षिण
आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला आहे.
ब्रिटिश माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता, त्यांच्या
राजवटीविरुध्द लढा द्यायला गांधीजींनी शिकवले.​

Answers

Answered by Shwetakenjale
10

Answer:

भारतीय संस्कृतीची एक मोठी शिकवण-अहिंसा

प्राण घेणे, जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारिरीक इजा करणे तसेच दुसऱ्याचे मन दुखावणे,टोचून बोलणे,अपमान करणे, आनंद हिरावून घेणे ही सारे हिंसेची रूपे आहेत. हिंसा कधी करू नये ही आपल्या भारतीय संस्कृतीची मोठी शिकवण आहे.अहिंसा एक मोठे मूल्य आहे व गांधीजी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहेत.

Similar questions