सारांशलेखन सामाजिक समता मराठी
Answers
Answer:
Here your answer dear
Explanation:
महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या तत्त्वज्ञानचा रथ सामाजिक समता व सामाजिक न्याय या दोन चाकांवर वाटचाल करीत होता. त्यांचे सर्व लेखन, शिक्षण व सुधारणावादी चळवळी या समाजमान्य प्रस्थापनेकरिताच होत्या. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या क्रियाशीलतेला भरभक्कम आधार लाभलेला होता. म्हणूनच त्यांचे सामाजिक समतेचे व सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान हे भावी काळातील नवसमाजरचनेला वरदानच आहे.
स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानी समाजात सामाजिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानी संविधानाच्या माध्यमातून केला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकात सामाजिक समता व सामाजिक न्यायाचा अत्यंत काळजीपूर्वक व जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. ही उल्लेखाची प्रक्रिया महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक समता व सामाजिक न्यायाच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानापासून सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांना तथागत गौतम बुद्ध व संत कबीर यांच्याप्रमाणेच गुरू मानले. प्रामुख्याने जोतिबा फुले यांच्या मानवतेच्या विचारांची परंपरा पुढे चालविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मूल्यांना मानवी जीवनात सत्य, अहिंसा व न्याय या चिरंतन मूल्यांइतकेच महत्त्व आहे. सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जिथे उच्चार होईल तिथे महात्मा जोतिबा फुले यांच्या लिखाणाच्या व या लिखाणातून व्यक्त होणाऱ्या कृतिशीलतेचा नक्कीच विशेषत्वाने उल्लेख होतो. जन्मामुळे व्यक्तीला श्रेष्ठत्व देणे, एका विशिष्ट वर्णातील व जातींतील व्यक्ती श्रेष्ठ व इतर कनिष्ठ असे विषमतावादी तत्त्वज्ञान त्यांना मान्य नक्हते.
महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा रथ सामाजिक समता व सामाजिक न्याय या दोन चाकांवर स्थानापन्न होऊन आपल्या यशाची वाटचाल करीत होता. त्यांचे सर्व लेखन, शिक्षण व सुधारणावादी चळवळी या समाजमान्य प्रस्थापनेकरिताच होत्या. त्यांच्या या तत्त्वज्ञानाच्या क्रियाशीलतेला भरभक्कम आधार लाभलेला होता. म्हणूनच त्यांचे सामाजिक समतेचे व सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान हे भावी काळातील नवसमाजरचनेला व उदयाला वरदानच असल्याचे दिसून येते.
महात्मा जोतिबा फुले यांनी ज्या समाजपरिवर्तनाची अपेक्षा केली होती, त्याचा मूलाधार प्रामुख्याने शिक्षणच होय याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. शिक्षणामुळे आर्थिक विषमता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करता येते व त्याद्वारे न्यायतत्त्वावर आधारित उच्च दर्जाचा सामाजिक न्यायही प्रस्थापित करता येतो असे त्यांना नेहमी वाटत होते.
त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘स्वातंत्र्य, समता व बंधुप्रेम ही चिरस्थायी मूल्ये शिक्षणातून निर्माण झाली तरच मानवी व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास होऊन सामाजिक समता प्रस्थापित होते.’’
शिक्षणात जनजागृती, जनजागृतीतून समाजक्रांती, समाजक्रांतीतून नवसमाजाची निर्मिती हे महात्मा फुलेंच्या जीवन शिक्षणाचे प्रमुख सूत्र होते. जोतिबा फुले यांचे वैचारिक तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्मवाद, कार्यवाद व वास्तववाद यांचा सुरेख त्रिवेणी संगम होय. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला मानवता धर्म, विश्वधर्म व सर्वधर्मसमभाव हेच जोतिबा फुले यांनाही शिक्षणातून मानवतेच्या विचारांची पेरणी करणारी बुद्धिमता माणुसकी निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक वाटत होतीं.
सामाजिक समता व सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर नवसमाजाची निर्मिती हिंदुस्थानात होत आहे. या उदयोन्मुख हिंदुस्थानी समाजाची जडणघडण करण्यात जोतिबांच्या लेखनातील विचारधनाचे आगळेवेगळे स्थान समजून घेणे व त्याप्रमाणे कृती करणे आजच्या काळाची गरज आहे. ही महत्त्वपूर्ण गरज महात्मा जोतिबांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारांच्या जागरातून पूर्णत्वास नेता येईल. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यपूर्ण समाजजीवनाच्या इतिहासात महात्मा फुले यांचे जसे एकमेकाद्वितीय स्थान आहे तसेच त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रविकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान हिंदुस्थानच्या स्वातंत्र्योत्तर समाजजीवनाच्या इतिहासात अढळ आहे.
हिंदुस्थानी समाजाला लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित सामाजिक समता व सामाजिक न्याय, बंधुभाव प्रस्थापित करणारी सामाजिक क्रांती हवी आहे. किंबहुना, अशी सामाजिक क्रांती व्हावी आणि समता, न्याय व बंधुभाव ही मूल्ये जनमानसात रुजावीत असेच महात्मा जोतिबा फुले यांचे स्वप्न होते. त्यांच्या विचारांचा जागर व आचरणातून हे स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात आणायला हवे. तीच आजची सामाजिक गरज आहे.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनाचा मानवतावाद हा ध्यास होता. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जिवाचे रान केले. अस्पृश्यतेला काचा फोडून गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारले. सामाजिक समता व सामाजिक न्यायाचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान मांडणारे सक्रिय विचारवंत अशीच महात्मा जोतिबा फुले यांची ओळख आहे व राहील.