India Languages, asked by vepraunalirechanan, 1 year ago

सूर्य उगवलाच नाही तर !,

Answers

Answered by tejasmba
414

सूर्य उगवला नाही तर 

सूर्या शिवाय सृष्टिची कल्पना संभवच नाही आहे. जीवनाचे दूसरे नाव आहे सूर्य. जर हा सूर्यच उगवला नाही तर. तर सर्व सृष्टीच नष्ट होणार. सगळी कडे अंधार, काळोख पसरणार. कुणालाही कामावर जाण्याचा उत्साहच नाही राहणार.

सूर्याच्या प्रकाशातच झाडे प्रकाश-संश्लेषणाद्वारा प्राथमिक अन्न तयार करतात. आणि जीवांना आवश्यक असलेला प्राण वायू सोडतात. म्हणजे जीवांना आवश्यक असलेला प्राणवायु (ऑक्सीजन) हे सुद्धा अप्रत्यक्षरीत्या सूर्यच पुरवितो. जर सूर्यच उगवला नाही तर वनस्पती अन्न तयार करणार नाहीत. तर मग सजीव काय खाणार, श्वास कसा घेणार. पाऊस देखील होणार नाही कारण बाष्पी करण होण्याकरिता देखील मदत करतो तो सूर्यच.

सूर्य नाही म्हणजे सकाळ होणार नाही, कोंबडा आवरणार नाही, पशु-पक्षांची किलबिलाट ऐकायला येणार नाही. संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार उडेल.  

म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पना देखील करवत नाही. जीवनाचे दूसरे नाव आहे सूर्य. 

Answered by halamadrid
13

■■सूर्य उगवला नाही तर!■■

सूर्य आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. रोज सकाळी सूर्य उगवल्यावर दिवसाची सुरुवात होते.

सकाळी आपल्याला कोंबड्याचे आरवणे व पक्षांचा चिचिवाट ऐकायला येतो. त्यांचे आवाज ऐकूण आपल्याला आपले काम करण्यासाठी उत्साह येतो. तेव्हा, सूर्य उगवला नाही तर! हा विचारच खूप भयंकर आहे.

सकाळ झाली की लोकांची दिनचर्या सुरु होते.काही लोकं जॉगिंग साठी बाहेर निघतात.पोरं शाळा, कॉलेजला जातात.लोकं कामाला जातात.सूर्य उगवला नाही तर,कोणालच आपले काम करता येणार नाही.

सूर्यप्रकाशामुळे झाडांना त्यांचे जेवन बनवता येते व त्यांची वाढ होते.सूर्यप्रकाशामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते व पावसाचे ढग तयार होतात,आणि पाऊस पडतो.

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचे आरोग्यासाठी बरेच फायदे असतात.सूर्य उगवला नाही तर,या गोष्टी होणार नाहीत. सर्वत्र अंधारच अंधार होईल.वातावरण थंडगार होईल.निसर्गाचा तालमेल बिघडेल.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेता,सूर्य उगवला नाही तर!! हा विचारच आपण मनातून काढून दिला पाहिजे.

Similar questions