सूर्य उगवला नाही तर.....!
Essay in marathi
Answers
Explanation:
सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध, Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi : दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे, शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल !
खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील. अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही !