India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

सूर्य उगवला नाही तर या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
56

सूर्य उगवला नाही तर......  ही कल्पनाच करवल्या जात नाही. सूर्य म्हणजेच 'दिनकर', 'दिन' म्हणजे 'दिवस', जर सूर्य उगवला नाही तर दिवस उजडणार नाही. रात्रीच्या अंधारातून सकाळच्या प्रकाशात आणणारा ग्रह म्हणजे सूर्य. जीवन जगण्यासाठी हवा, पाणी, अन्नाची गरज असते, हे सर्व सूर्याच्या किरणांमुळे शक्य होऊ शकते. सूर्याच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न तयार करतात. सजीवांचा जीव की प्राण असलेल्या प्राणवायूची सूर्यामुळे प्रक्रिया होते. तसेच पाण्याचे उत्सर्जिकरणही सूर्यच करतो. सूर्यावाचून जीवन जगणे अशक्य होईल. काही निरंतर काळानंतर सूर्य उगवला नाही तर भरदिवसा काळोख राहील संपूर्ण पृथ्वीवर हाहा:कार उडेल, ऋतुचक्र, हवामान बदलेल. सर्व सृष्टी निर्जीव होईल म्हणूनच पृथ्वीवर पाणी व अन्नाप्रमाणेच सूर्याची किरणे आवश्यक आहे.

Similar questions