India Languages, asked by aarushi6750, 1 year ago

सूर्य उगवला नाही तर ... या विषयावर निबंध
Surya ugavala nahi tar Marathi nibandh

Answers

Answered by Mandar17
342

पृथ्वीवरील जीवनाचा मुख्य स्रोत सूर्य आहे. सूर्याची ऊर्जा कधीही न संपणारी आहे.सूर्यमुळे पृथ्वीवरील दिवस आणि रात्र आहे.. सूर्य पृथ्वीपेक्षा 10 दशलक्ष पटीने मोठा आहे. आणि सूर्य आकाशगंगेतील सर्व ग्रहांना उर्जा आणि उष्णता देततो. पण अचानक सूर्य उगवला नाही तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता का? आज पाहूया या की जर सूर्य अचानक कुठेतरी हरवला तर त्याचा काय परिणाम होईल ...

गुरुत्वाकर्षण शक्ती

सूर्य उगवल्यानंतर, त्याचा प्रकाश व उर्जा ८मिनिट आणि १९सेकंदात पृथ्वीवर येतो . परंतु तो जर उगवला नाही तर पृथ्वीवर फक्त ८ मिनिटे एकाच सूर्यप्रकाश राहील त्यानंतर, पृथ्वीवर अनंतकाळपर्यंत रात्रीची सुरूवात सुरू होईल. सूर्य न उगवल्याने आपण केवळ सूर्यप्रकाश किवा ऊर्जा नाही तर पृथ्वी गुरुत्वाकर्षण देखील गमावून बसेल. आणि ह्यामुळे पृथ्वी सूर्याच्या कक्षातून बाहेर पडेल. तसेच वर्तुळाकार फिरणारी पृथ्वी सरळ रेषेत 18 मैल वेगाने प्रवास सुरू करेल आणि अवकाशात हरवून जाईल .

प्रकाश संश्लेषणाची कृती

वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषून आणि पाण्याचा वापर करून अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश वापरतात. सूर्याशिवाय, वनस्पती कार्बन डाय ऑक्साईडचा वापर शकत नाहीत आणि ऑक्सिजन सोडू शकत नाहीत. अशा प्रकारे, वनस्पती मध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया देखील सूर्यप्रकाशाशिवाय थांबविली जाईल.याचे परिणाम खूप वाईट होतील कारण वातावरणात कार्बोन डाय ऑक्साइडचे प्रमाण खूप वादळे जाईल आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी भूतकालात जातील.  

पृथ्वीवरील तापमान

सूर्याशिवाय, आपल्या पृथ्वीवरील तापमान कमी सुरू होईल आणि संपूर्ण ग्रह गोठून जाईल . संपूर्ण पृथ्वी गोठायला खूप वर्षे लागतील मात्र पृथ्वीच्या वातावरणातील तापमान तब्बल  उणे 240 अंश पोहोचेल.

ह्या सगळ्यात साहजिकच आहे की आपली सगळी जीवन जाती नष्ट झाली असेल म्हणूनच सूर्य नेहमी उगवला पाहिजे.

Answered by KINGHARSHAD
40

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध, बघणार आहोत. सुर्य उगवला नाही तर असा विचारही करणे आपल्‍यासाठी कठीण आहे. कारण जसे मानवाला अन्‍न, वस्‍त्र, निवारा या मुलभुत गरजा आहेत त्‍यासोबतच सुर्याचीपण नितांत आवश्‍यकता आहे.ते खालील निबंधावरून समजुन घेता येईल.

 दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्‍हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,  

शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल ! 

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील.

अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही ! 

Similar questions