सूर्यग्रहणाची दोन वैशिष्ट्य सांगा
Answers
Answer:
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.
Answer:
सन २०२० हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरत आहे. माणसाने कधी विचारही केला नसेल, अशा गोष्टी सन २०२० मध्ये घडताहेत. खगोलीय घटनांसाठीही सन २०२० हे वर्ष अतिशय वेगळे आणि अचंबित करणारे ठरत आहे. यावर्षी एकूण सहा ग्रहणे लागणार आहेत. यापैकी चार चंद्रग्रहणे असून, दोन सूर्यग्रहणे आहेत. जानेवारी, जून, जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात चंद्रग्रण, तर जून आणि डिसेंबर महिन्यात सूर्यग्रहण आहे. ५ जून ते ५ जुलै या एका महिन्याच्या कालावधी तब्बल तीन ग्रहणे लागणार आहेत. यातील दोन ग्रहणे चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्या म्हणजेच २१ जून २०२० रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण एकूण सुमारे ५ तास ४८ मिनिटे असेल. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण याचे काही प्रकार असतात. प्रत्येक ग्रहण हे एकासारखे नसते. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण आणि जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रग्रहण घडते. ग्रहणाचे नेमके प्रकार किती आहेत? पैकी जून महिन्यातील सूर्यग्रहण कसे असेल? जाणून घेऊया.