सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी का पाहू नये
Answers
Answer:
I don't know sorry noooooooo
गुरुवारी सकाळी लागणारे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला येथील नेत्रतज्ञ डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिला आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. खगोलशास्त्र विद्यार्थी शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य लोकांना देखील ग्रहण पाहण्याची उत्सुकता आहे.ग्रहणाबाबत अनेक समज गैरसमज आहेत. परंतु त्याच बरोबर ग्रहणाच्या महत्त्वाच्या सत्य गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्रहणामुळे होणाऱ्या डोळयावरील अपाय. सूर्यग्रहणाच्या वेळेत सूर्यकिरणामधुन उत्सर्जित होणाऱ्या Ultravoiolet radiation ( 7290mm ) व इन्फ्रारेड (Infrared radiation) सारख्या किरणामुळे डोळयाला अकाली वृद्धत्व येण्याचा धोका असतो. इतर वेळी सूर्याच्या प्रखर प्रकाशाकडे आपण पाहु शकत नाही व प्रकाशामुळे डोळयाची बाहुली (pupil) आकुंचन पावते व हानीकारक UV किरणं डोळ्यात जात नाहीत. सूर्यासमोर चंद्र आल्यामुळे प्रकाशाची प्रखरता कमी होते व बाहुली अकुंचन पावत नाही व डोळ्यामध्ये हानीकारक किरण जाऊन डोळयाला हानी पोहचते. उदा. कमी वयात मोतिबिंदू होणे व तात्पर्यानेr अंधत्व येते.डोळयांनी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी होळयाच्या मागील बाजूस पडदा, आतपटल (Retina) च्या मधोमध (Macula) नावाचा भाग असतो. Infared किंवा Ultraviolet किरणाच्या संपर्कामुळे (Retina) Rodas and Corens च्या पेशी जळतात व कायमचे अंधत्व येते. अशा किरणांमुळे होणाऱ्या इजेच्या वेळी वेदना होत नाहीत व त्यांचा प्रभाव प्रत्यक्ष संपर्कानंतर काही तासांनी दिसतो. मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या व नैसगिक लेन्स काढून त्याजागी हलक्या प्रतीच्या Evprotection नसलेल्या लेन्स टाकलेल्या Macular Burn होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. Macular Burns मुळे होणाऱ्या अंधत्वावर आजवरच्या वैदक शास्त्रात उपाय नाही.
ग्रहणामध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या इजेपासून वाचता येऊ शकते व त्यासाठी –
हे करू नका –
उघडया डोळयांनी सूर्याकडे पाहु नका.
यामधुन सुर्यग्रहण पाहणे धोक्याचे- काळा चष्मा , X – ray , cds फोटोची निगेटिव्ह, कॅमेरा किंवा दुर्बीण
पूर्ण सूर्यग्रहण बघण्यापूर्वी त्याचे प्रतिबिंब पाहावे.
हे करून ग्रहण पहा –
आयएसओ प्रमाणित चष्म्यातूनच सूर्यग्रहण पाहा.
सूर्यग्रहण पाहण्यासाठी 14 क्रमांकाची वेल्डींगची काच वापरा.
एकाच डोळयाचा वापर करा. सूर्यग्रहण पाहताना जवळ अनुभवी व्यक्ती हवी.
नेत्रतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला सर्वांनी पाळला तर ग्रहण पाहणाऱ्यांना कसलीही इजा डोळ्यांना होणार नाही.