India Languages, asked by dgulati4332, 2 months ago

साऱ्या तू स्वतःला बाजूला सारून समुद्राचं झालो या वाक्याची चिंतन करून आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा

Answers

Answered by gaurangi4659
1

Answer:

‘वि. स. खांडेकर चरित्र' मूळ रूपात सप्टेंबर, २०१२ मध्ये श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या चरित्र ग्रंथमाला'च्या प्रथम संचात प्रकाशित करण्यात आले होते. ऑक्टोबर, २०१३ मध्ये त्याचे पुनर्मुद्रण करण्यात आले होते. हे चरित्र प्रथम प्रकाशित झाले तेव्हा त्यास डॉ. अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास, नागपूर आणि लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिकाचे रु. २५०००/- चे अर्थसाहाय्य लाभले होते. आता अक्षर दालन, कोल्हापूरतर्फे त्याची सुधारित तिसरी आवृत्ती येते आहे, त्याबद्दल आनंद असून या चरित्र प्रकाशनास वेळोवेळी साहाय्य करणा-यांचे प्रारंभीच मी आभार मानतो.

मराठी साहित्यात यापूर्वी वि. स. खांडेकर चरित्राच्या अनुषंगाने वा. शि. आपटे, वा. रा. ढवळे, मा. का. देशपांडे, जया दडकर, प्रभृती मान्यवरांनी लिहिले आहे. अलीकडच्या काळात मी वि. स. खांडेकरांच्या समग्र असंकलित, अप्रकाशित साहित्य प्रकाशनाचा जो प्रकल्प हाती घेतला, त्यात कादंबरी, कथासंग्रह, रूपक कथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, मुलाखतसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, व्यक्तिलेखसंग्रह, पटकथासंग्रह आत्मकथनपर लेखसंग्रह अशी वीस पुस्तके प्रकाशित केली आहेत. आणखी कादंबरी, प्रस्तावनासंग्रह, समीक्षासंग्रह, वैनतेय लेखसंग्रह, विनोदी लेखसंग्रह, नाट्यछटा अशी डझनभर पुस्तके प्रतीक्षित आहेत. पैकी निम्मी प्रकाशनाधीन असून निम्मी प्रक्रियाधीन आहेत. दरम्यानच्या काळात वि. स. खांडेकरांची दोन स्मृती संग्रहालये उभारण्यात आली. त्यांत संकल्पना, संशोधन, साधनसंग्रह करण्याचे कार्य मी केले. ही संग्रहालये शिवाजी विद्यापीठ, वि. स. खांडेकर भाषा भवन, कोल्हापूर व वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे आपणास पाहता येतील. या सर्व धडपडीत वि. स. खांडेकर चरित्राचे नवे पैलू उलगडले. काही नवे संदर्भ हाती आले. त्यामुळे चरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाली होती. या काळात वि. स. खांडेकरांचे पुनर्मूल्यांकन झाले होते या अनुषंगाने मी अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून वेळोवेळी लिहिले होते. आकाशवाणी, कोल्हापूरहून काही व्याख्याने ही प्रक्षेपित झाली होती. त्या सर्वांचा सुधारित आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक, अभ्यासक, संशोधकांसाठी हे पुस्तक म्हणजे अद्यतन संदर्भसाधन बनेल, असा मला विश्वास वाटतो.

मूळ चरित्र लिहिले तेव्हा तरुण वाचकवर्ग माझ्यासमोर होता. पुनर्मूल्यांकन प्रकरणात जे सात-आठ लेख अंतर्भूत करण्यात आले आहेत, त्यात काही ठिकाणी पुस्तकाकारात द्विरुक्ती वाटली तरी त्या त्या प्रकरणाची गरज म्हणून ती आहे तशीच ठेवली आहे. संपादनात ते टाळणे खरे तर शक्य होते, पण मग तिथे उणीव भासू लागते, विषयविस्तार व विवेचनात अपुरेपण येते. त्यामुळे तुटक संदर्भ परिपूर्ण होण्यास साहाय्यही होते असे वाटल्यावरून मूळ लेखातील मजकूर तसाच ठेवला आहे.

Answered by Anonymous
0

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जवळून परिचय कधी झाला नाही. पण त्यांच्या ललितनिबंधांतील अप्रतिम शैलीमुळे ते जवळचे वाटायला लागले. माझ्या आवडत्या लेखकांमधील ते एक आहेत. अधूनमधून अलीकडच्या काळात त्यांना लिहिलेल्या पत्रांतून आणि दूरध्वनीवरून झालेल्या संवादामुळे ही जवळीक वाढली. अभिरुचिसंपन्न लेखक म्हणून ‘सत्यकथा’ मासिकामुळे १९६५ पासून त्यांची ओळख झालीच होती. महाविद्यालयातील विद्यार्थिदशेत त्यांचे या मासिकातून प्रसिद्ध होणारे ललित निबंध वाचणे हा एक आनंदानुभव होता. काव्यात्मकतेने ओथंबलेले, तरल संवेदनायुक्त आणि छोट्या-छोट्या वाक्यांतून समर्थ शैलीद्वारे अनोखे शब्दशिल्प साकार करणे हा त्यांचा स्थायी भाव. मिताक्षरांमधून अर्थसघन आशय व्यक्त करणारे, शब्दांतून चित्रमय सृष्टी दृग्गोचर करणारे कवितेसारखेच हे लेखन. कधीकधी या ललितबंधाला कविता का म्हणू नये असा प्रश्‍न मनात निर्माण व्हायचा. ‘सत्यकथा’ मासिकाच्या जुन्या संचिका हाताळताना श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या कवितादेखील झळकल्या होत्या हे प्रत्ययास आले. कवितेचा हात त्यांनी जरी सोडला तरी कवित्वशक्तीचा पाझर त्यांच्या अंतर्यामी कायमचा राहिला. ललित निबंध या एकाच वाङ्‌मयप्रकाराकडे त्यांनी लक्ष एकाग्र केले. मोजके लिहून गुणवत्तेचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ हे त्यांचे चार ललितनिबंधांचे संग्रह. भावसंपन्नतेचा प्रत्यय देणारे. निसर्गाच्या संपन्न रूपकळेला नित्यनूतन शब्दकळेतून साकार करणारी त्यांची प्रतिभा. सहसा कुणाला न लाभणारी. त्यांच्या लेखनाला चोखंदळ रसिकवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठीतील डॉ. सरोजिनी वैद्य, प्रा. शांता शेळके, डॉ. सुधा जोशी आणि प्राचार्य म. द. हातकणंंंंंगलेकर यांच्यासारख्या मर्मज्ञ आणि रसज्ञ समीक्षकांनी तदात्म होऊन त्यांच्या ललितनिबंधांवरची समीक्षा लिहिली. ‘मनातल्या उन्हात’ हा त्यांचा पहिला ललित निबंध. ‘डोह’मध्ये समाविष्ट झालेला ‘आम्ही वानरांच्या फौजा’ हा ललित निबंध ‘सत्यकथा’ मासिकात ऑक्टोबर १९६१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. मराठी साहित्यात नवी संवेदनशीलता येत असल्याच्या पाऊलखुणा या काळाच्या आसपास दिसत होत्या. पूर्वीच्या संकेतप्रणाली मोडून नवे काहीतरी घडविण्याची जिद्द लेखक-कवींमध्ये आढळून येत होती. अशा वेळी त्यांनी हे लेखन केले. १९६० ते १९६२ च्या दरम्यान श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ‘रूप’ या कवितेला वाहिलेल्या लघुनियतकालिकाचे संपादन केले. त्यात इंदिरा संत, द. भि. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, शांताराम रामचंद्र शिंदे, प्रल्हाद वडेर, व. ह. पिटके, वासंती मुझुमदार आणि सिंधू अराणके इत्यादींनी लेखन केले. साहित्याच्या नव्या मळवाटेवरचे हे लेखन होते

Similar questions