सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटाने अडो;
वियोग घडता रडो; मन भवच्चरित्री जडो ।।
it's urgent please tell me of this meaning
Answers
Answered by
9
Answer:
meaning:मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो.
साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिलें असतां हट्टानेंच त्यानें तेथें अडून राहावें आणि इतकें करूनही त्या सधुचरणांचा वियोग झालाच तर त्यानें (पोटभर) रडावें, (तरीपण) त्यानें तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेंत निहमी रंगून जावे.)
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Math,
1 year ago