संस्कृत मध्ये लिहा पावसाळ्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते
Answers
Answer:
Explanation:इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो.
क्वचित प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले, फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे (जांभळा बाहेरील कडेस व तांबडा आतील कडेस असणारे) दुय्यम इंद्रधनुष्यही दिसते.
इंद्रवज्र
संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल "इंद्रवज्रच" असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते.