संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Answers
Answered by
18
Explanation:
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतानी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवतगीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव ,संत तुकाराम ,संत एकनाथ यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयावर समजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले. सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातीतील भक्तांची मांदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी यांसारख्या संतानी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदास यांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.
Similar questions