संताचे कर्या निबंध
IN MARATHI
Mark as brainliest
Answers
Answer:
अखिल विश्वाच्या कल्याणासाठी संतांनी धर्मध्वज हाती घेऊन जनजागृती व श्रद्धामय चिंतन केले. हाती वीणा- टाळ घेऊन प्रसंगी समाजातील दांभिकतेवर प्रहार केला. प्रबोधनाचा दिवा संतांनी तेवता ठेवल्यानेच समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत राहिला. संत वाङ्मयातून भक्ती आणि समाज वर्तनाचे सूत्र मांडलेले दिसते. संप्रदाय कुठलाही असला तरी संतांचे वैश्विक विचार, त्यांचे सैद्धांतिक तत्त्वज्ञान आणि परमात्म्याशी तादात्म्यभाव हे गुण दिसून येतात. म्हणूनच संत महिमा अगाध आहे. संत विचारांच्या मार्गाने गेल्यास प्रगती हमखास होणार असे धाडसाने सांगितले जाते, ते सत्यच आहे.
बुडणाऱया माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा, त्याचप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. संतांनीच भगवंताला सगुणात आणले. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरिताच असते. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात; त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल! असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितले आहे. संत कार्याचा, शिकवणीचा समृद्ध वारसा आपणास लाभला आहे हे काही कमी नव्हे.
संत आणि संत वाङ्मयाचा परीघ मुळातच मोठा आहे. त्यांचा वावरही त्याप्रमाणे व्यापक आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव यांनी हजारो मैल अंतरावर असलेल्या पंजाब राज्यात जाऊन भक्तीचा अगाध महिमा मांडताना उद्बोधनातून प्रबोधन केले. त्याचा परिणाम म्हणजे सतत अत्याचार अन् आक्रमक असणाऱया येथील व्यक्ती समूहाला शांत केले. संत नामदेवांसमोर नतमस्तक होत समाज- व्यक्ती प्रगतीचा वसा घेतला. पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव (अर्थात संत नामदेव) यांचे मंदिर आहे. गुरुनानकांप्रमाणेच नामदेवांना तेथे मानाचे सुवर्णपान मिळालेले आहे.
संगमनेर (जि. नगर) येथील महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांनी ‘ दीप चैतन्याचा’ हा सुमारे 400 पानांचा ग्रंथ लिहून महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, तमिळ, पंजाबी, हिंदी आदी संतांच्या कार्याची सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे. त्यातही सुमारे 84 प्रकरणांतून संतचरीत, संत कार्य महिमा मोजक्या शब्दात ओवला आहे. ही सर्व माहिती उद्बोधक आणि रंजक आहे. पुस्तकात वैश्विक विषय आणि अध्यात्म या विषयाअंतर्गत 13 प्रकरणे आहेत. याचप्रमाणे सामाजिक चिंतन विषयात 12, साहित्य आणि सौंदर्यमध्ये 6, स्थान महात्म्यमध्ये 7 तसेच संतांचे कार्य विभूतीमत्त्व विषयाखाली 46 प्रकरणांत पुस्तकाची विभागणी आहे.या विषयांपैकी वैश्विक विषय आणि अध्यात्म, साहित्य आणि सौंदर्य हे दोन विषय विशेष महत्त्वाचे आहेत. संत साहित्याचे योगदान काय यासाठी वरील विषय मोलाचे ठरतात आणि ते अभ्यासपूर्ण आहेत. संत वाङ्मयातून भक्तीचा प्रचार, प्रसार झालेला आहे. परंतु समाजाचे ज्याद्वारे पोषण होते ती कृषी संस्कृती व पर्यावरण यासंदर्भात संतांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आढळून येते. कृषी संस्कृतीला तडा बसू नये याकरिता संतांनी अभंगातून विचार मांडले आहेत. संत सावता माळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदींनी तर परखड अभंग रचून कृषी संस्कृती व पर्यावरणाशी एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज देशात काय परिस्थिती आहे या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षांपूर्वी संतांच्या वाङ्मयातून सापडतेही!
साहित्याचे क्षेत्र विस्तृत आहे. त्यात संत साहित्याला मानाचे स्थान आहे. संत साहित्यातून भाषेचा गोडवा गायिला गेलेला आहे. खऱया अर्थाने ते अस्सल लोकसाहित्य ठरलेले आहे. यातून वैश्विक मैत्रीची अभिलाषा व्यक्त झाली आहे. संतांच्या मांदियाळीने देवघरातील दिवा सातत्याने तेवता राहिला आहे हे ‘दीप चैतन्याचा’ या पुस्तकातून कळते. पुस्तकाला प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्र्ाबुद्धे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहेच; शिवाय लेखक डॉ. लिंबेकर यांची भूमिका ही वाचकांना प्रेरक ठरणारी आहे. पुस्तकाची प्रणीत सुस्ते यांनी केलेली मांडणी अन् अपूर्वा ग्राफिक्सने केलेले मुखपृष्ठ दर्जेदार आहे.
Explanation:
please mark me in brainlist.