History, asked by Divyapatil24, 2 days ago

संताची शिकवण यावर तुमचे विचार लिहा??​

Answers

Answered by Sauron
12

Explanation:

मानवास योग्य आचरण तसेच योग्य दिशा दाखवण्याचे कार्य संतांनी सदैव केलेले आहे

महाराष्ट्राची भूमी संताच्या अस्तित्वाने पावन तसेच पवित्रमय झाली आहे. महाराष्ट्राला 'संतांची भूमी' म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण याच ठिकाणी अनेक नामवंत तसेच प्रसिद्ध संत उदयास आले.अनेक संतांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी अनेक ग्रंथ तसेच भारुड इत्यादींचे लेखन केले.

संत ज्ञानेश्वर यांनी 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाद्वारे 'भगवद्गीतेचे' ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ज्या काळात शिक्षणाचा अधिकार मर्यादित लोकांपुरताच होता त्या काळात 'ज्ञानेश्वरीच्या' माध्यमातून 'भगवतगीते'चा उपदेश सर्वांपर्यंत पोहोचवून अध्यात्माचा मार्ग दाखविला. संत तुकाराम महाराजांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' म्हणत झाडांचे पर्यावरणातील असणारे महत्त्व पटवून सांगितले. गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संत एकनाथ महाराज म्हणत प्राणीमात्रांवर दया करा. स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव करू नका आणि त्याप्रमाणे ते आचरण करत असत. संत रामदास यांनी 'मनाचे श्लोक' याद्वारे मनाला शुद्ध तसेच संस्कारित करण्याचा मार्ग दाखविला.

अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी निस्वार्थ होऊन समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केलेले आहेत.

Similar questions