Sociology, asked by khandaresm72gmailcom, 1 year ago

संत गाडगेबाबा महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?

Answers

Answered by Anonymous
13

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.

Answered by franktheruler
5

संत गाडगेबाबा महाराजांनी जनतेला खालील उपदेश दिला.

  • गाडगे बाबा यानी समाजातील अज्ञान , अनिष्ट रूढ़ि प्रथा, अंध श्रद्धा, हे सर्व दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
  • या साठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंब केला.
  • त्यांचे उपदेश सादे व सरऴ आहे.
  1. चोरी करू नका, सवकारा पासून कर्ज घेऊ नका.
  2. व्यसनांचा आहारी जाऊ नका.
  3. देव धर्माच्या नावा खाली प्राण्यांची हत्या करू नका.
  4. जातिचे भेद करू नका.
  5. ते आपल्या कीर्तनात सांगत असत की देव दगड़ात नाही , तो माणसात आहे, आमच्या हा शरीरात आहे.
  6. संत तुकाराम महाराजाला ते आपले गुरु मानीत , " मी कोणाचा गुरु नाही, माझे कोण शिष्य नाही " असे ते कायम म्हणत .

हे सर्व विचार सर्वानां पटवून घेण्या साठी ते ग्रामीण भाषेचा प्रयोग करित असत.

#SPJ3

Similar questions