संत गाडगे महाराज स्वच्छतेचे महत्व तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. गावोगावी हे अभियान राबविल्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले आहे. पण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव का दिले असावे?
चला तर आपण आज स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांच्या संबंधी उद्बोधक अशी माहिती पाहूया. म्हणजे आपल्याला संत गाडगेबाबांचे नाव ग्रामस्वच्छता अभियानाला काय दिले हे लक्षात येईल.संत गाडगेबाबांचा जन्म वर्हाडातील शेंडगाव या गावांमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव डेबू असे ठेवले. संत गाडगे बाबांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते.आताची मुले डेबू हे नाव ऐकून हसू लागतात. परंतु पूर्वीच्या काळी अशी जरा वेगळी नावे आपल्या महाराष्ट्रात होती. शिक्षणामुळे झालेला बदल आपल्याला लक्षात घेतला पाहिजे.
संत गाडगेबाबांचे वडील लहानपणीच वारले. आईने मग डेबुला बरोबर घेऊन भावाकडे जाऊन राहिली. मामाच्या शेतावर राहू लागला प्रत्येक काम हे अतिशय मनापासून करण्याची डेबुला हौस असे. कोणतेही काम करायचे ते अगदी नीटनेटके आणि टापटीप. ज्याला आपला हात लागेल ते सुंदर दिसले पाहिजे इतके काम उत्कृष्ट करण्याची पद्धत डेबूची होती.