India Languages, asked by sonupomendkar416, 14 days ago

संत ज्ञानेश्वरांनी रचिला​

Answers

Answered by bcsharma1945
7

Answer:

ईश्‍वराच्या कृपेने मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्या थोर विभूती जन्माला आल्यात, त्यांच्यामध्ये संत ज्ञानेश्‍वरांची गणना करावी लागेल. संतश्रेष्ठ ज्ञानदेव ही भगवद्भक्तांची ‘माऊली’ म्हणून मराठी संतसाहित्यात ओळखली जाते. मराठी संतसाहित्यनिर्मितीचा विचार करता ज्ञानदेव हे त्याचे महामेरू मुकुटमणी मानावे

संन्याशाची मुले म्हणून त्यांना कर्मठ ब्राह्मणांनी वाळीत टाकलं. त्यामुळे काही काळ परित्यक्त ब्राह्मण म्हणून घालवावा लागला. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये म्हणून ज्ञानेश्‍वरांच्या आईवडिलांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्‍चित्त घेतले.

ज्ञानदेवांनी ‘भावार्थ दीपिका’ या भगवत्‌गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य नेवासा (अहमदनगर जिल्हा) येथे राहून पूर्ण केले. संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत आणले म्हणून ‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी वाङ्‌मयाचे देशीकार लेणे म्हणावे लागेल. ज्ञानदेवांनी मराठी भाषाभिमान व ज्ञानेश्‍वरीची महती व्यक्त केली ती पुढील ओवीतून प्रत्ययास येते.

माझ्या मर्‍हाटाचि बोलू कौतुके|

परि अमृतातेहि पैजा जिंके|

ऐसी अक्षरे रसिकें| मेळविन ॥ ६१४)

ज्ञानेश्‍वरीत कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोगावर सुमारे ९०० ओव्या इ.स.१२९० मध्ये त्यांनी लिहिल्या. विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याची महती कथित करणारा ‘अमृतानुभव’, चांगदेवांना लिहिलेली ६५ ओव्यांची उपदेशपर व अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम दर्शन घडविणारे ‘चांगदेव पासष्टी’ या संत ज्ञानदेवांच्या इतर वाङ्‌मय निर्मिती होत.

तेराव्या शतकातील मराठी संत कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ म्हणून संत ज्ञानदेवांचे स्थान वाङ्‌मयात अन् वारकरी सांप्रदायिक भक्तगणात अढळ आहे.

जो जे वांछिल तो ते लाहो, असे म्हणत अखिल विश्‍वाची काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्‍वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माऊली’ म्हणतात. आत्मानंदाचा, अविनाशी सुखाचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून ज्ञानेश्‍वरीच्या द्वारे मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून सोडला. गुरूकृपेने आपणास प्राप्त झालेला आनंद सर्व जगाला द्यावा अशी त्यांची विश्‍वहितात्मक दृष्टी-भावना होती.

दिसो परतत्त्व डोळा| पाहो सुखाचा सोहळा|

रिघो महाबोध सुकाळा| माजी विश्‍व॥

तैसा वाग्विलास विस्तारु| गीतार्थेसी विश्‍व भरु|

आनंदाचा आवारु| मांडू जगा॥

अशा शब्दात त्यांनी आपला विश्‍वव्यापक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. ईश्‍वराने सूर्याला दिलेला प्रकाश किंवा चंद्राला दिलेले अमृत आपोआपच सर्व जगाला प्राप्त होते, त्याप्रमाणे मला आपण दिलेला आनंद मी बोललो नाही तरीही जगाला मिळणारच आहे. कारण तो जगाकरताच मला देवाने दिला आहे, असे संत ज्ञानदेव म्हणतात.

जीव- जगत् व जगदात्मा याचा यथार्थ अद्वैत सिद्धांत ज्ञानेश्‍वरांनी मांडला आहे. आपण देह नसून अविनाशी चैतन्य आहोत आणि हेच चैतन्य सर्वत्र भरले आहे, असे स्वरूपाच्या अद्वैताचे ज्ञान झाले म्हणजे ‘तरति शोकमात्मवित्’, या आत्मवेत्त्याला शोक, मोह, दुःख, भीति स्पर्श करू शकत नाहीत.

‘मी विश्‍वेसी विश्‍वात्मा’ हा विश्‍वाच्या किंवा जगाच्या खर्‍या चिन्मय स्वरूपाचा सिद्धांत ते सांगतात. आत्मज्ञान झाले तरी ते ठसावे, स्थिर व्हावे म्हणून मन शुद्ध करावे लागते. निष्काम कर्म, भक्ती व योग ही चित्तशुद्धीद्वारा आत्मज्ञानाची तीन साधने आहेत.

म्हणौनि जे जे उचित | आणि अवसरे करुनि प्राप्त|

ते कर्में हेतुरहित| आचर तूं॥

हेतुरहित केलेले, उचित व निःस्वार्थ कर्तव्यकर्म बंधक तर होत नाहीच पण निश्‍चित मोक्ष देते. स्वधर्मानुसार प्राप्त झालेले काम म्हणजेच कर्तव्यकर्म होय. एवढे ध्यानात ठेवून कसल्याही फळाची अपेक्षा न बाळगता कर्म करीत रहावे. म्हणजे ते सत्कारणी लागेल.

भक्तिविषयी सांगताना त्यांनी निर्गुणावर श्रद्धा ठेवून त्याला शरण जाणे, त्याच्याशी चित्त एकाग्र करणे हीच खरी भक्ती मानली आहे.

स्थूलाकारी नाशिवंते| भरवसा बांधोनि चित्तें|

पाहति मज अविनाशातें | तरी कैसेनि दीसे॥

स्थूल आकार म्हणजे परमात्मा किंवा परमेश्‍वर नव्हे. कारण आकार विनाशी आहे. सर्वव्यापक, अव्यक्त, अमूर्त असा ईश्‍वर भूतमात्रांच्या हृदयात आहे. त्यांच्याविषयींची आपली कर्तव्ये निष्काम बुद्धीने केल्यामुळेच या सर्वात्मक परमेश्‍वराची खरी पूजा होते. हे तत्त्वज्ञान भक्तियोगात संत ज्ञानदेवांनी भक्तास कथित केले आहे. सामान्य साधकांनी भक्तियुक्त निष्काम कर्मयोगाचे साधनच स्वीकारावे असे ज्ञानदेवाचे मत होते. देह म्हणजे मी ही भ्रांति ज्याची गेली त्याला अजर, अमर व सुंदर आत्मस्वरूप समजल्याने परम आनंद होतो. सौंदर्य हा शरीरगत भाव नाही. तो आत्म्याचा अव्यक्त भाव आहे. आत्मज्ञानाने प्रत्येक माणसाला जरा- मरणाच्या भयापासून मुक्त होऊन सुंदर होता येते, असे मत ज्ञानदेवांनी मांडले आहे.

Explanation:

PLEASE MARK ME AS THE BRAINLIEST!!@!

Answered by JSP2008
2

या अभंगात तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील भागवत-धर्ममंदिराचा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला असे निक्षून सांगितले आहे. श्री ज्ञानदेवांनी घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर हे महाराष्ट्र भागवत धर्ममंदिर, ही वारकरी संप्रदायाची इमारत सुदृढ स्थितीत आजही उभी आहे. लक्षावधी प्रेमळ भक्तांच्या भावजीवनाचे ते आजही विश्वसनीय आलंबन आहे. महाराष्ट्रात आजवर अनेक धर्ममार्गांचे प्रवर्तन करण्यात आले. तथापि भक्कम तात्त्विक, नैतिक तसेच वैचारिक अधिष्ठानाच्या अभावी त्यातील काही धर्मपंथांचा र्‍हास झाला, तर कित्येक धर्मपंथांमध्ये अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तींचा शिरकाव होऊन शेवटीं अनाचार- भ्रष्ट्राचार माजल्याचे दिसून आले l

वारकरी धर्मपंथ मात्र श्री ज्ञानदेवांच्या काळी होता तसाच पवित्र नि तेजसंपन्न आजही आहे. याचे कारण ज्ञानदेवांनी घातलेल्या अतिशय भक्कम व विविधांगी पायांत आहे. आपण जर आस्थेने व श्रद्धेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानदेवांनी घातलेल्या या भक्कम पायाची विविध अंगे आपणांस स्फटिकाप्रमाणे स्वच्छ दिसू शकतात. आपण भागवत धर्ममंदिराच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवांनी घातलेल्या पायाची विविध अंगे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया l

Similar questions