CBSE BOARD X, asked by pravinvaity1411, 3 months ago

संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करा.​

Answers

Answered by kalivyasapalepu99
70

आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही, कारण मानवी जीवन यंत्रवत बनले आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना काही ना काही आजाराने ग्रासले आहे, त्यामुळे आज संतुलित आहार काळाची गरज बनली आहे. संतुलित आहार म्हणजे शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे, यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील, असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत, अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.

संतुलित वजन हे निरोगी आरोग्याचे पहिले लक्षण आहे. अनेक जण वजन संतुलित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याऐवजी डाएटिंग करतात. त्यामुळे वजन कमी तर होत नाही, पण शरीराचे पोषण नीट होत नाही. काही लोक जिम, योग हे करतात, पण ते बंद केले तर आणखी वजन वाढते. म्हणजेच त्यातही सातत्य हवे. या सर्व कारणांमुळे संतुलित आहाराला प्राधान्य देणे गरजेचे आहे .त्यासाठी सर्वप्रथम बाहेरचे चमचमित, मसालेदार पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. अंड्यामध्ये प्रथिने भरपूर असतात, संत्र्यामध्ये भरपूर कॅलरीज् आणि फायबर असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रमाणात राहून आपोआप वजन नियंत्रणात राहते, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. मोड आलेले कडधान्य, दूध, हिरव्या भाज्यांमुळे शरीराला सर्व पोषक तत्त्वे मिळतात. सर्व व्यक्तींची अन्न गरज एकसारखीच असते असे नाही. कामाच्या स्वरूपावरून आहाराचे प्रमाण वेगळे असते. कष्टांची कामे करणार्‍यांची ऊर्जा ही बैठेकाम करणार्‍यांच्या ऊर्जेच्या गरजेपेक्षा अधिक असते. म्हणून शारीरिक कष्टाची कामे करणार्‍यांची अन्न गरज जास्त असते. पोट पुढे आलेली, हातापायाची काड्या झालेली, चेह-यावर तजेला नसलेली आणि पिस्टमय व प्रथिने यांची कमतरता असल्यामुळे शरीरांची वाढ झालेली नसते, रोगाशी सामना करू शकत नाहीत, असंतुलित आहारामुळे पोषण झालेले नसते, यालाच कुपोषण म्हणतात तसेच काही त्रुटीजन्य विकारही लहान बालकात आढळतात. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने लहानपणीच लसीकरण व मध्यान्ह भोजन सुरू केले आहे. आपण पाहतो वापर न केल्यास यंत्रेही गंजतात, मानवाच्या शरीराबाबतही ते खरे आहे. विशिष्ट कामाच्या पद्धतीमुळे स्नायू व विशिष्ट अवयव यामध्ये विकृती निर्माण होते.

म्हणून दररोज व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम हा शारीरिक तंदुरुस्तीचा पाया आहे. व्यायामामुळे स्नायू कार्यरत होतात. रक्त व लसिका यांचे अभिसरण सुधारते. हृदयाची शक्ती वाढते, शुद्ध हवा शरीरात खेळते, भूक वाढते यासाठी व्यायामाचे खूप महत्त्व आहे. जसे चालणे, पोहणे, मैदानी खेळ इ.आपल्या आरोग्यावर शरीरातल्या व शरीराबाहेरच्या अनेक गोष्टी परिणाम करत असतात. शरीराबाहेरचे घटक म्हणजे वातावरण, आर्थिक स्थिती यामुळे आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या देशात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले जातात. दक्षिणेकडे इडली, डोशासारखे पदार्थ लोकांना आवडतात. महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण भात प्रचलित आहेत. उत्तरेकडे आलू पराठा, छोले भटोरे सर्वांच्या आवडीचे पदार्थ आहेत. अन्नपदार्थ तयार करण्याच्या आपल्याकडील पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वापार म्हणजे वर्षानुवर्षे. त्यापैकी काही पद्धतीमुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते. हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आणून केलेल्या उसळी आपण खातो. मोड येताना धान्यांमधील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते. तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा आंबवून इडली, डोसा, आंबोळी, असे पदार्थ तयार केले जातात. आंबवण्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्त्वात वाढ होते, त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते. याउलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजत ठेवणे, शिजलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे, अशामुळे पदार्थाची पौष्टिकता कमी होते. शिजणार्‍या पदार्थातून पाणी काढले असता या पाण्यात विरघळलेले उपयुक्त घटक पाण्यांबरोबर निघून जातात. अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्यातील काही उपयुक्त घटक नाश पावतात.

थोडक्यात आरोग्यावर परिणाम करणार्‍या बहुतेक घटकावर आपले नियंत्रण नसते. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित आहार, पुरेशी झोप आणि जोडीला व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. जरी विभिन्न आपले वेश, भाषा विभिन्न आपले अन्न परी शारीरिक तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार गरजेचे आहे. आहाराबरोबर विहाराची पण गरज आहे. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे चांगले पोषण होते. म्हणून आजच्या आधुनिक काळात संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

please mark my answers as brainliest

Similar questions