CBSE BOARD X, asked by chinmayi77, 9 months ago

संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
plz tell me fast​

Answers

Answered by upesnehag
6

Hope it's helpful for you

if you satisfied with this answer then pls mark me as brainliest

Attachments:
Answered by ItzAshleshaMane
12

Answer:

(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर:

प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात.

संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली (आई) मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पहात असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात

Explanation:

Hope it will help you..

Similar questions