संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट
Answers
२. संतवाणी
(अ) अंकिला मी दास तुझा
कवी : संत नामदेव (१२७०-१३५०):
कवितेचा परिचय :-
प्रस्तुत अभंग संत नामदेवांचा आहे. विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त आहेत. ते विठ्ठलाचा माऊली मानतात. माऊली म्हणजे आई. आई ज्या प्रमाने मुलावर प्रेम करते. त्याच प्रमाणे माऊलींनी माझ्यावर प्रेम करावे, अशी आर्त शब्दात विठ्ठलाला त्यांनी विनवणी केली आहे.
अग्निमाजि पडे बाळू । माता धांवे कनवाळू ।1१॥॥
तैसा धांवें माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ।1२1।
सवेंचि झेंपावें पक्षिणी । पित्रीं पाडतांचि धरणीं ।।81।
भुकेलें वत्सरावें । धेनु हंबरत धांवे ।1४॥।
वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरणी ।।५॥।
नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तेसा ।॥६1।
* कवितेचा भावार्थ :-
या अभंगात संत नामदेव स्वत:ला माऊलींचे बाळ समजतात. ते म्हणतात, ज्या प्रमाणे आगीत चुकून पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी आई धावत जाते त्याचप्रमाणे माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तु देखील धावून ये. मी तुझा दास आहे. मी तुझ्या चरणी लीन झालेलो आहे. तुझा परमभक्त आहे. झाडावरून अकस्माक जर पिल्लू जमिनीवर पडले तर क्षणाचाही विलंब न करता पक्षीण जमिनीकडे झेप घेते. त्याला वाचण्याचा प्रयत्न करते.
वासरू जर भुकेले असेल तर गाय हंबरत त्याच्याकडे येते. रानात वनवा पेटला तर आपले पाडसे से त्यात सापडले तर नाही ना ह्याने हरिणी व्याकुळ होते.
संत नामदेव म्हणतात, “मी चातक पक्षी आहे.” तो जसा पावसाच्या पाण्यावर जगतो. तसाच मी पण विठ्ठलाच्या मायेवर जगतो. हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा माझ्यावर वर्षाव होऊ दे. माझे जीवन तू सांभाळून घे. अशी मी तुला विनंती करतो.
Answer:
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
Explanation: