)स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयानुसार थांबणे. *
Answers
अंडाशय : स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये असतात. प्रत्येक अंडाशयाची लांबी सु. ३ सेंमी., रुंदी १·५ सेंमी. व जाडी सु. १ सेंमी. असते. बाल्यावस्थेत अंडाशयाचा रंग भुरकट गुलाबी व पृष्ठभाग गुळगुळीत असून ते बदामासारखे फुगीर व लंबगोल असते. अंडाशयाचे बाह्यक आणि मध्यक असे दोन भाग असतात. बाह्यकाच्या जननअभिस्तरातील घनाकृती पेशींपासून अंडपुटके तयार होतात. जन्मल्यानंतर स्त्री अर्भकाच्या अंडाशयात १०–२० लाख अंडपुटके असतात.
स्त्रीच्या जन्मानंतर नवीन अंडपुटके तयार होत नाहीत. एवढेच नाही तर, प्रत्येक महिन्याला अंडपुटकांचा ऱ्हास होऊन त्यांच्या संख्येत घट होत असते. पहिले ऋतुचक्र म्हणजे मासिक पाळी सुरू होईपर्यंत अंडाशयात ३–४ लाख अंडपुटके शिल्लक राहतात. अंडपुटके वाढून अंडपेशीनिर्मिती होऊ लागल्यानंतर अंडाशयाचा पृष्ठभाग खडबडीत व पुटकुळ्या आल्यासारखा दिसू लागतो. या अंडपुटकांचा दर महिन्याला सु. १०० या दराने ऱ्हास होत असतो. राहिलेल्या अंडपुटकांपैकी दर महिन्याला सु. २० अंडपुटके वाढतात आणि त्यांपैकी केवळ एकाच अंडपुटकापासून अंडपेशी तयार होते. स्त्रीच्या ३०—३५ वर्षांच्या प्रजननकाळात म्हणजे पौगंडावस्था ते रजोनिवृत्तीच्या १०—४५ वर्षे वयाच्या कालावधीत सु. ४०० अंडपेशी फलनासाठी उपलब्ध होतात.
अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ही स्त्री-संप्रेरके निर्माण होतात. स्त्रियांची शारीरिक लक्षणे व प्रजनन यांसाठी इस्ट्रोजेन आवश्यक असते. इस्ट्रोजेनाच्या प्रभावामुळे स्त्रियांमध्ये स्तनांची वाढ, गर्भाशयाची वाढ तसेच गर्भाशय-अंत:स्तराची वाढ, ऋतुचक्राचे नियमन इ. कार्ये घडून येतात. जेव्हा अंडपुटके संपतात, तेव्हा अंडाशयाद्वारे इस्ट्रोजेननिर्मिती थांबते आणि रजोनिवृत्ती अवस्था येते. प्रोजेस्टेरोनाच्या प्रभावामुळे दर महिन्याला गर्भाशय-अंत:स्तरामध्ये होणारे बदल नियंत्रित केले जातात. अंडाशयातून काही वेळा टेस्टोस्टेरोन हे पुरुष संप्रेरक स्रवले जाते. वयाेमानानुसार स्त्री संप्रेरक कमी प्रमाणात स्रवल्यास, टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाचा प्रभाव वाढताे आणि त्याच्या प्रभावामुळे स्त्रियांमध्ये दाढी-मिशा येण्यासारखी पुरुषांची लक्षणे दिसू शकतात.