Hindi, asked by ayushisonbhadre, 23 hours ago

स्त्री समाज सुधारकांची वेशभूषा व त्यांची वचने.
Plz answer fast !
If you will anwer vary fast I will mark you as 'brainliest' !!!

Answers

Answered by bikshampuram1988
2

Explanation:

संत रामानुजाचार्य यांनी समाजात सुधारणा घडवण्यासाठी जाती आणि सर्व प्रकारचे भेद दूर सारून समतेचा संदेश दिला. केंद्र सरकारचे ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हे धोरणही याच समतेच्या तत्त्वावर आधारित असून त्यामुळे दलितांना-वंचितांना घर, शौचालय, मोफत गॅस, जनधन खात्यासारखे लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय मिळाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

संत आणि क्रांतिकारी समाज सुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठय़ा मुद्रेतील पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. रामानुजाचार्याचे भक्त आणि वैष्णव पंथीय एचएच चिन्ना जियार स्वामी यांच्यासह केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते. या पुतळा अनावरण सोहळय़ासह १०३५ यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सबका साथ सबका विकास सबका प्रयास’ या केंद्र सरकारच्या धोरणाची सांगड मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्यासमोर त्यांच्या तत्त्वाशी घातली. समाजातील सर्वाना प्रतिष्ठा मिळावी. दलित उपेक्षित घटक वंचित न राहता त्यांना विकासात भागीदार होता यावे या दृष्टीनेच सरकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. घर, शौचालय, आरोग्य विमा, जनधन खाते, मोफत वीज जोडणी ही त्याचीच उदाहरणे आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. रामानुजाचार्य यांनी सुधारणेसाठी ललित उपेक्षितांना जवळ करत त्यांना सन्मान दिला आणि धर्म भेदभाव शिकवत नाही हे उदाहरणासह दाखवून दिले, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. तसेच वाईट प्रथा रूढ होतात तेव्हा समाज सुधारणांसाठी कोणीतरी महापुरुष पुढे येतो हा आपला इतिहास आहे. त्या काळात जरी अशा सुधारकांना काही विरोध झाला तरी नंतर त्यांचा स्वीकार होतो आणि सन्मानही मिळतो, असे सूचक विधान मोदी यांनी केले. हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा करत आणि त्यानिमित्ताने सरदार पटेल यांची आठवण काढत मोदी यांनी रामानुजाचार्य हे एक हजार वर्षांपासून खऱ्या अर्थाने समानतेचे आदर्श ठरले आहेत. त्यांनी एक हजार वर्षे रुजवलेली शिकवण पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी १ हजार कोटी रुपये जनसहभागातून गोळा करून हा प्रकल्प उभारण्यात आला.

रामानुजाचार्याचा ‘समतेचा पुतळा’

’ श्री रामानुजाचार्य हे श्री पेरूमबूदूर, तमिळनाडू येथे १०१७ मध्ये जन्माला आले. वैष्णव परंपरेतील संत व समाजसुधारक म्हणून ओळखले जाणाऱ्या रामानुजाचार्य यांनी सामाजिक, सांस्कृतिक, स्त्री-पुरुष, आर्थिक आणि जातिभेद असे सर्व भेदभाव दूर सारण्याची शिकवण देत समतेचा विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले. रामानुजाचार्य यांचा समतेचा संदेश अधोरेखित करण्यासाठी त्यांचा २१६ फुटी पुतळा तेलंगणमधील हैदराबादजवळील शमशाबाद येथे ४५ एकर जागेवर उभारण्यात आला असून त्यास स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी म्हणजेच समतेचा पुतळा असे नाव देण्यात आले.

’ हा पुतळा एकसंध असून चींनमधील एरोसन कार्पोरेशन या कंपनीने तयार केला आणि तेथून समुद्र मार्गाने तो भारतात आणला गेला. बैठकीच्या मुद्रेतील जगातील हा दुसरा सर्वात मोठा पुतळा आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक अशा पंचधातूनी ही मूर्ती घडवण्यात आली. बांधकामात १०८ दिव्य देसमच्या प्रतिकृतीसह तामीळ संत अलवारस यांच्या कार्यात नमूद विष्णू मंदिराचे १०८ नमुने कोरलेले आहेत. २१६ फुटी पुतळय़ात रामानुजाचार्य यांच्या हाती १३५ फुटांचा त्रिदंडम असून तो निसर्ग, आत्मा आणि ईश्वर या तीन शक्तींच्या एकात्मतेचे म्हणजेच रामानुजाचार्य यांनी सांगितलेल्या विशिष्ट अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.

’ या प्रकल्पाची पायाभरणी २०१४ मध्ये श्री चिन्ना जियार स्वामी यांच्या हस्ते झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला रामानुजाचार्य पुतळय़ाच्या खाली १२० किलो सुवर्णजडित खोलीचे अनावरण होणार आहे.

मोदींचे सोनेरी धोतर-शाल आणि दाक्षिणात्य टिळा

विविध राज्यांतील दौऱ्यात तेथील वेशभूषा करून लोकांच्या प्रादेशिक अस्मितेला सुखावण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न नेहमीच दिसून येतो. रामानुजाचार्य पुतळा अनावरण आणि हवन विधी सोहळय़ात सहभागी होताना सोनेरी रंगाचे रेशमी धोतर व त्याच रंगाची शाल पांघरून आणि कपाळावर वैष्णव परंपरेतील उभा दाक्षिणात्य टिळा अशा वैष्णव पंथीय वेशभूषेतून मोदींनी दाक्षिणात्य अस्मितेला अप्रत्यक्ष साद घातली.

The post ‘सबका साथ’ धोरणाला समतेच्या तत्त्वाचा आधार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; रामानुजाचार्य यांच्या समतेचा पुतळय़ाचे अनावरण.

Similar questions