"स्त्री शिकली प्रगती झाली " या बाबत महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मत जीवनाला कसे लागू पडते ते तुमच्या शब्दात लिहा
Answers
Explanation:
स्त्री ही घरातील महत्वाची व्यक्ती असते. लहान मुलांवर स्त्री संस्कार करत असते मुलांचे संगोपन करत असताना ती बोलत असलेल्या सर्व गोष्टींचा प्रभाव तिच्या मुलांवर पडत असतो .
स्त्री जर शिकलेली असेल तर सहाजिकच तिचे विचार हे चांगल्या प्रकारचे असतील. ती प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा तसेच आधुनिक गोष्टींचा विचार करते. कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नसून त्यामागे काहीतरी विज्ञान असते अशी तिची भावना असते.
जर स्त्री शिक्षित नसेल तर तिच्यावर अंधश्रद्धेच्या प्रभाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मुलांवर देखील पारंपारिक व आंध्र सध्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असते.
स्त्री ही आपल्या माहेरच्या माणसांशी तसेच सासरच्या माणसांशी जोडलेले असल्यामुळे दोघेही कुटुंबांना पुढे आणण्याचे काम स्त्री करत असते. म्हणून घरातील स्त्री शिक्षित असणे हे खूपच गरजेचे आहे.
समाजात चालत असलेल्या चुकीच्या रूढी, परंपरा, चालीरीती बंद करण्यासाठी स्त्रीने जर पुढाकार घेतला तरच पूर्ण समाज बदलण्याची शक्यता असते. म्हणूनच महर्षी धोंडो कर्वे यांना असे वाटते की स्त्री शिकली म्हणजे प्रगती झाली .