India Languages, asked by PragyaTbia, 11 months ago

स्त्री शक्ती या विषयावर भाषण
Speech on women's power in Marathi

Answers

Answered by Mandar17
40

पंडित जवाहर लाल नेहरुनी एक वाक्य म्हटलेले आहे की “जर लोकांना जागे करायचे असेल तर त्या घरातील सगळ्या महिला वर्गाला जागृत असणे गरजेचे आहे”. जेव्हा स्त्री तिचे पाऊल पुढे टाकते तेव्हा संपूर्ण कुटुंब, संपूर्ण गाव पुढे जातो आणि देशाचा विकास घडतो. परंतु महिला जो पर्यंत त्यांचे अधिकार समजू शकत नाही तो पर्यंत समाजातील अनेक राक्षसी घटनांना आणि वृत्तींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.स्त्री आणि पुरुष हा लैंगिक भेदभाव देशाला सामाजिक सांस्कृतिक तसेच आर्थिक आणि शिक्षणिक स्तरावरसुद्धा देशाला पाठीमागे टाकतो. स्त्री शक्ति बद्दल काही लिहायला गेलेतर मन कावरेबावरे होते याचे कारण देखील असेच आहे.कारण पुरुषांच्या जोडीला एक स्त्री चालते तर दुसरी स्त्री या जगात तिचे अस्तित्व शोधत आहे.मग कुणाबद्दल लिहायचे याचा संभ्रम मनामद्धे तयार होतो.तरी सुद्धा फक्त चूल आणि मूल या धोरणात असलेल्या स्त्रीने आज आपल्या घरचा उंबरठा ओलांडलेला आहे.आजची स्त्री ही पूर्वीसारखी राहिलेली नाही तर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने चाललेली आहे.आजची स्त्री कुणाची तरी बायको, बहीण,आई, आत्या,आजी,असून देखील ती कोणत्या तरी कंपनीची सीईओ,बॉस,किवा मग तेथील एखादी कामगार म्हणून तर नक्कीच असेल.तिची ताकद जरी वाढली असली तरी तिच्यामधील सहनशिलता मात्र अजिबात हरवलेली नाही आहे.अजून ही ती सहन करतच आहे.परंतु आता मात्र तिने सहन करणे थांबवले पाहिजे कारण तिच्याकडे आज अनेक महिलांचे अनुभवआणि नेतृत्त्व आहे.आणि तिने स्त्री शक्ति अजून वाढवली पाहिजे.

Similar questions