स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय
Answers
Answer:
स्त्रीवादी इतिहास
Explanation:
१९६०च्या दशकामध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी जागतिक शांततेविषयी विचार मांडले. दोन महायुद्धांच्या काळात अनेक स्त्रीवादी संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांवर झाला. ‘सुरक्षा’ या संकल्पनेची व्याप्ती वाढली. ‘मानवी हक्कांची सुरक्षा’ या संज्ञेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतर शाखांप्रमाणे स्त्रीवादामध्येदेखील झाला. १९८०च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात स्त्रीवादी दृष्टीकोनाला महत्त्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रीवाद्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिले. वैश्विक समजल्या जाणाऱ्या अनेक संज्ञा पुरुषी मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञावर टीका केली. त्यांनी ‘युद्ध’, ‘सुरक्षा’ व ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ या संबंधीच्या ज्ञानाच्या संरचनेमध्ये लिंगभावविषयक मुद्द्यांचा समावेश नाही, असा युक्तिवाद केला.
उत्तर :
१. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका आहे.
२. ही भूमिका फ्रेंच विदुषी 'सीमाँ - द - बोव्हा' हिने मांडली.
३. स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला.
४. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियनस्, संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबींवर संशोधन सुरू झाले.
५. १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.