History, asked by pritirajane311, 3 months ago

सूत्रसंचालनाची दोन क्षेत्रे सांगा​

Answers

Answered by lashkarpooja9
3

Answer:

कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालनाला कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असते

स्वरूप संपादन करा

सूत्रसंचालन हि जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्राशुद्धा आहे. सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो. तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. या काळात श्रोत्यांच्या भावनेत वाहात न जाता अलिप्त राहत सातत्याने भानावर असणे गरजेचे असते. केवळ निवेदन वाचणे अथवा भाषण करणे इतकेच याचे स्वरूप नसून कार्यक्रम खुलवण्याचे काम सूत्रसंचालकामार्फत केले जाते. सूत्रसंचालन करताना -

कार्यक्रम भरकटतोय का?

प्रत्येक टप्पा नियोजितरित्या वेळेवर सादर होतोय का?

हे पाहिले जाते.*समोर श्रोते कोण आहेत हे लक्षात घेऊन त्यांना निवेदन सादर केले जावे

सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्त्व संपादन करा

कार्यक्रमानुसार सूत्रसंचालनाची शैली बदलते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते. समारंभानुसार आवेशयुक्त, उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन केले जाते.

सूत्रसंचालन करताना समोरचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे, हे लक्षात घ्यावे. आणि मगच बोलायला सुरवात करावी.[१]

सूत्रसंचालनातील विविध टप्पे संपादन करा

श्रवण व निरीक्षण

वाचण

आवाजाची जोपासना

ध्वनीवर्धकाचा वापराचा सराव

प्रसिद्धी

सूत्रसंचालन करण्यापूर्वी :

कार्यक्रमाचा वेळ,विषय,स्थळ,तारीख,अतिथी,वक्ते,कलावंत,श्रोतवर्ग इत्यादींबाबत माहिती असावी.

कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.

कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे.

अपेक्षित प्रेक्षक यांचा वयोगट,स्थर,अभिरुची,इत्यादी बाबी विचारात घ्याव्या.

निवेदनाची संहिता तयार करावी.त्यामध्ये आवश्यक संधर्भ,सुवचने,अवतरणे,काव्यपंक्ती यांची नोंद करावी ,परंतु त्यांचा अतिरेक नसावा.

कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच अंदाज घ्यावा .

Similar questions