India Languages, asked by omkarmurkute97, 7 hours ago

सूत्रसंचालन ही एक वलयांकित व्यवसाय आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा.​

Answers

Answered by rajraaz85
5

Answer:

कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हा चांगला असणे गरजेचे असते.

सूत्रसंचालकाच्या कौशल्या वरच प्रेक्षक कार्यक्रमाला आनंदाने अनुभवतात.

कुठल्याही कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जर चांगला नसेल तर तो कार्यक्रम व्यवस्थित पुढे जात नाही व प्रेक्षकही त्याच्यात रमत नाही. म्हणून कुठल्याही कार्यक्रमाचा सूत्रसंचालन फार महत्त्वाचा असतो.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालनकाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय बनला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस सूत्रसंचालन कोण करणार यावरून त्या कार्यक्रमा बद्दल लोक मत ठरवतात. सूत्रसंचालक हा नेहमी प्रेक्षकांसमोर असल्यामुळेच तो व्यवसाय वलयांकित झाला आहे.

Similar questions