संत तुकारामांच्या मते कोणाशी सलगी करु नये ?
Answers
Answered by
0
"अगं पोळ्या काय करत बसली. तुकोबा निघाले वैकुंठाला. चल चल लवकर." शेजारची बाई आवलीला सांगायला येते. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशीच धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात. "आम्ही जातो आमुच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा" असं तुकोबा गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजन 'पांडुरंग हरी'च्या तालावर नाचू लागतात.
आवली धावत पळत तिथवर पोहोचते, पण तोवर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड आसमंतात झेपावतो.
1936 साली रिलीज झालेल्या 'संत तुकाराम' या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठी गेले, असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत.
पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का? हा प्रश्न गेली चार शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक लाईव्हमध्ये 'संत तुकारामांचा खून झाला होता' असं वक्तव्य केलं. वारकरी संप्रदायातील काहींनी त्यांचा निषेध केला. नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे त्यांनी हा व्हीडियो फेसबुकवरून काढून टाकला. पण यामुळे तुकारामांच्या मृत्यूविषयीची कुजबूज पुन्हा सुरू झाली.
'सोशल मीडियाच्या काळात तुकोबांची शिकवण दाखवते योग्य दिशा'
पंढरपूरच्या वारीमध्ये मनुवादी, सनातनी विचारांचीही 'दिंडी'
जेव्हा रायगडावर मेघडंबरी बसवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती...
जितेंद्र आव्हाडांनी हे विधान कोणत्या हेतूने केलं, हा इथे चर्चेचा विषय नाही. पण त्यांनी केलेलं विधान सत्य आहे की नाही, हे तपासून पाहणं आवश्यक आहे. कारण अशी शक्यता व्यक्त करणारे ते पहिले नाहीत. आजपर्यंत कुणी कीर्तनातून या प्रश्नाला वाचा फोडली, कुणी पुस्तकात दाखले दिले तर कुणी 'तुकारामांची हत्या झाली', अशी जाहीरपणे मांडणी केली.
संत तुकारामांच्या मृत्यूवरून अधूनमधून असं वादळ का घोंघावतं याचा आम्ही शोध घ्यायचं ठरवलं. दोन्ही बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केला.
संतसाहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. "पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये", असं मोरे यांना वाटतं.
"गेली 100 वर्षं सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेकवेळा केलेला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड जे म्हणतात त्यात नवीन काही नाही," असंही ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.
Similar questions