Hindi, asked by kaivalyathorat7, 2 days ago

सुट्या नसत्या तर निबंध​

Answers

Answered by XxllMrDemonllxX
1

Explanation:

रविवारची सुट्टी नसती तर निबंध | Ravivarchi Sutti Nasti Tar : आठवड्यामध्ये रविवार नसता तर काय बरे होईल ? आठवडा फक्त सहा दिवसाचा होईल. म्हणजे रोज फक्त कामच करावे लागेल. ' रविवार आला, आता मज्जा, आता आराम करायचा, उशिरा उठायचं, रविवारी सुट्टी असे काही म्हणता येणार नाही. सहा दिवस काम केल्यावर कामाचा शीण घालवायला रविवार नसेल, तर आपल्याला पुन्हा ताज्या दमाने काम करायला उत्साहच वाटणार नाही. आपण मरगळ आल्यासारखे होऊ. कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा येईल.

यासाठी आठवड्यामध्ये आपल्याला रविवारी सुट्टी आवश्यक आहे. रविवार आला की त्या दिवशी घरातले सगळेजण आपापल्या सोयीची रविवारची मजा घेतात आणि सोमवारी नव्या उमेदीने आणि उत्साहाने कामाला सुरुवात करतात. म्हणून रविवार हा आठवड्यातला सर्वात महत्त्वाचा वार आहे

Answered by itzmecutejennei
0

Answer:

मित्रमैत्रिणींनो, आज आपण जर पुस्तके नसती तर या निबंध विषयावर बोलणार आहोत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पावसाळा सुरु झाला. आता माझी शाळा ही सूरू होणार आहे. शाळा सुरु होणार म्हंटल की मला नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन छत्री किंवा नवीन रेनकोट, नवीन पावसाळी चप्पल आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच नवीन वर्षाच्या इय्यतेची नवीन पुस्तके मिळतात. पण माझ्या मनात आले की जर पुस्तके नसती तर? किती मज्जा आली असती! किती वेगळी कल्पना आहे ना?

जर पुस्तके नसती तर शाळेत गेल्यावर आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय शिकवले असते? आणि जर पुस्तके नसतील तर शाळेत जाताना पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होऊन जाईल आणि जरी दप्तर असलेच तर त्यात फक्त खाण्याचा डबा आणि पाण्याची बाटलीच असली असती आणि जेव्हा शाळेच्या वाचनालयात जाऊ तेव्हा तर तिथे सगळे कप्पे रिकामेच दिसलें असते.

hope it helps

Similar questions