सातवाहन (मराठी: सातवाहन साम्राज्य ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून असल्याचे पैठण येथील मिळालेल्या नाण्यावरून त्याची ओळख पटते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा अगोदर आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वाशिष्टीपुत्र पुळूमावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. आधीचे मौर्य साम्राज्यात बौद्ध धर्माचा बराच प्रभाव होता त्यामुळे यांनी बौ्द्ध विचारांशी निगडीत राहून राज्यकारभार केला. सातवाहन बौद्ध धम्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते. सातवाहन हे बौद्ध धर्मीय सम्राट असल्याचे स्पष्ट त्यांच्या कोरीव लेख आणि त्यांनी निर्माण केलेल्या लेण्यांच्या श्रुंखला तसेच स्तुपांचे शिल्पांकन हे सातवाहन चे बौद्ध असल्याचे पुरावे आहेत. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली
Answers
Answered by
0
Answer:
gxgxxgkgxgyksykdjcjkcjljifighkhckcjbj
Similar questions