सुदृढ शरीर हाच खरादागिना.यावर तुमचे विचार व्यक्त करा.
Answers
Answered by
4
Answer:
लहान असताना शुभंकरोती म्हणताना 'आरोग्यम् धनसंपदा' अशी ओळ आपण म्हणायचो. तेव्हा फारसं काही समजायचं नाही. पण जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसतसे आपल्याला समजते की 'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.'
आपल्याकडे खूप पैसे आणि संपत्ती असेल पण आपले शरीर रोगट असेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? आपल्याला तिचा नीट वापर सुद्धा करता येणार नाही. आपले शरीर आणि मन निरोगी असेल तरच आपण उत्साहाने काम करू शकतो. याउलट आपण आजारी असलो तर उपचारासाठी पैसा जातोच परंतु शरीराची हानी होते ती वेगळीच.
त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम यांची सांगड घालून आपले शरीर सुदृढ ठेवले पाहिजे. सुदृढ शरीर हाच खरा अलंकार असतो आणि हा अलंकार कोणत्याही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असतो.
Similar questions