India Languages, asked by itsme979, 2 months ago

‘सुदृढ शर र ह च धनसांपदा’ ह्याचे महत्त्व लक्षात येणे गरजेचे आहे. या पवषयी तुमचे पवचार सुमारे १७५ ते २०० शब्दात माांडा.

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे खरोखरच दुर्लक्ष करत चाललो आहोत. आपण सर्वांनीच या धावपळीच्या जीवनातून आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. सर्वांनीच नियमित व्यायाम केला पाहिजे. दररोज दिवसातून किमान एक तरी फळ खाल्ले पाहिजे. आपण स्वतःच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपले शरीर सुदृढ होण्यास मदत होईल. कारण आपले शरीर जर सुदृढ असेल तरच आपण सुखी जीवन जगू शकू आणि आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकू.

Explanation:

सुदृढ शरीर हाच खरा दागिना, अलंकार मराठी निबंध, माहिती

लोकमान्य टिळक यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट माझ्या मनावर विशेष ठसली. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षी त्यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचे ठरविले. तसा निश्चयपूर्वक प्रयत्न केला व सुदृढ शरीरसौष्ठव मिळवले. या सुदृढ शरीराचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी काळात खूप झाला.

सुदृढ शरीराचे महत्व पुराणकाळापासूनच मान्य केले गेले आहे. त्या काळी माणूस हा सतत निसर्गाच्या सहवासात होता. यंत्रांचा शोध लागलेला नसल्यामुळे तो स्वावलंबी होता, कष्टार्जित असे त्याचे जीवन होते. गुरुगृही राहणाऱ्या शिष्यांना नित्य कष्ट करावे लागत. महाभारतकाळात दंड, जोडी, कुस्ती, गदायुद्ध हे प्रकार होते. रामायणकाळातील मारुती ही पराक्रमाची, शरीरसुदृढतेची प्रतीक अशी देवता होती. बलोपासना हीच मारुतीची उपासना. समर्थ रामदासांनी तरुणांना याच शक्ती उपासनेचा मार्ग दाखविला. रामदास सांगतात-

“शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||

शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

शरीर सुदृढ नसेल; तर व्यक्तीच्या विदवत्तेचा व ज्ञानाचा त्याला किंवा समाजाला काही उपयोग होत नाही. गोपाळ गणेश आगरकर यांना तरुण वयापासून दम्याचा विकार होता. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. माधवराव पेशवे यांना उत्तम अयोग्य लाभले असते, तर कदाचित पेशवाईचा इतिहास बदलला असता. विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी किंवा तरुण वयात गणितात चमत्कार घडवणारे रामानुजन यांना उत्तम अयोग्य लाभले असते, तर ते भारताचे भाग्यविधाते ठरले असते.

शरीरसंपत्ती ही धनसंपत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण धनसंपत्ती पुनःपुन्हा संपादन करता येते, पण शारीरिक संपदा ढासळली तर परत मिळवणे फार जिकिरीचे. म्हणून व्यायामाची आवड लहानपणापासूनच लागायला हवी. ‘शरीरम आद्यं खलु धर्मसाधनम’ हे सुभाषित सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. शरीररूपी संपत्ती आपली आपल्यालाच मिळवावी लागते आणि प्राप्त केलेली ही संपत्ती प्रयत्नाने टिकवावी लागते.

आपल्या शरीराची स्वच्छता ही शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रथमतः महत्वाची आहे. आपण जेवणापूर्वी स्वच्छ हात धुतले पाहिजेत. बाहेरून आल्यावर स्वच्छ हात पाय धुतले पाहिजेत. जर आपले शरीरच स्वच्छ नसेल तर आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. तसेच भाज्यांचा वापर करताना प्रथम त्या धुवूनच घेतल्या पाहिजेत. फळे खातानाही ती प्रथम धुवून घेतली पाहिजेत. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होईल

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सवयी, व्यायाम, आहार

१. रोज नियमित व्यायाम केला पाहिजे.

२. जेवणाआधी स्वच्छ हात धुतले पाहिजेत.

३. वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्या ऋतूला साजेसा आहार घेतला पाहिजे.

४. पावसाळ्यात तेलकट, तूपट पदार्थ खाऊ नयेत.

५. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात थंड पदार्थ खाऊ नयेत.

६. दररोज किमान एक तरी फळ खाल्ले पाहिजे.

७. पुरेशी झोप आपल्या शरीराला मिळाली पाहिजे.

८. भाज्या स्वच्छ धुवूनच त्यांचा वापर केला पाहिजे.

९. पौष्टिक आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे, तरच आपले शरीर सुदृढ, निरोगी राहण्यास मदत होईल

Answered by Anushkaphokane
1

Answer:

i wrote this for u

i suppose u are in my school i got the same topic

Explanation:

Attachments:
Similar questions