स्थूल व्यक्तींपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी अधिक का वाजते?
Answers
Answered by
23
स्थूल व्यक्तीच्या शरीरात चरबीचे प्रमाण बारीक व्यक्तीच्या तुलनेत खूपच जास्त असते.
आपले शरीराचे विविध अवयव ऊतींद्वारे जोडले गेले आहे, त्यामध्ये चरबीयुक्त ऊती देखील येतात.
चरबीयुक्त ऊती ह्या शरीरातील अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला साठून राहतात, तसेच त्वचेखाली देखील यांचा साठा शरीराद्वारे केला जातो. या जेलीसदृश ऊती असतात ज्यामुळे उष्णतारोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे अशी विविध कार्ये केली जातात.
शरीरात तयार होणारे उष्णता चरबीयुक्त ऊतींमुळे शरीरातच रोखून धरली जाते.
त्यामुळे थंडीत स्थूल व्यक्तींना जास्त थंडी वाजत नाही कारण शरीरातील उष्णता शरीरातच दाबून राहते.
बारीक व्यक्तीच्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी असल्याने याच्या विरुद्ध क्रिया होते आणि त्यांना स्थूल व्यक्तींपेक्षा जास्त थंडी वाजते.
Similar questions